बसमधून महिलेच्या पिशवीतून सव्वा लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:00 PM2019-02-12T23:00:20+5:302019-02-12T23:01:19+5:30

शिरपूर : धुळे - शिरपूर दरम्यान बसमध्ये घडलेली घटना

 Latha worth lakhs of jewelery worth lakhs of rupees from the woman's bag | बसमधून महिलेच्या पिशवीतून सव्वा लाखांचे दागिने लंपास

dhule

Next

शिरपूर : धुळे येथील विकास कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेचे १ लाख ३४ हजार रुपयांचे सोने चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे येथील विकास कॉलनीत राहणारी महिला योगिता राहुल दाभाडे हिची लहान बहिण मनीषा रमेश पवार हिच्या साखरपुड्यासाठी बोराडी येथे येत होती. योगिता दाभाडे या मालेगाव येथे शासकीय वैद्यकीय दवाखान्यात नर्स म्हणून काम करतात.
त्या सकाळी साडेनऊ वाजता मालेगाव येथून मध्यप्रदेश परिवहन मंडळच्या शिर्डीइंदोर बसने शिरपूर येथे येण्यास निघाल्या. त्यावेळी त्यांनी आपले दागिने एका पिशवीत ठेवले होते. त्या साडेबारा वाजेच्या सुमारास शिरपूर बसस्थानकावर उतरल्या. त्यांनी दागिन्यांची पिशवी तपासली असता सोन्याच्या रकमा मिळून आल्या नाहीत. त्यांनी गाडीत जाऊन तपासले मात्र रकमा मिळाल्या नाहीत.
दाभाडे यांच्याजवळ पिशवीत साठ हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याची सोन्याची चैन, ३६ हजार रुपये किमतीची अठरा ग्रॅम सोन्याची मिनी मंगलपोत, आठ हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम सोन्याचे कानातील वेल, सात हजार रुपये किमतीचे साडेतीन ग्रॅम सोन्याचे कानातील वस्तू, सहा हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम सोन्याचे कानातील वस्तू, पाच हजार रुपये किमतीचे अडीच ग्रॅम सोन्याचे कानातील वस्तू, सात हजार रुपये किमतीचे साडेतीन ग्रॅम सोन्याची ठुसी, दोन हजार रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची अंगठी, दोन हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम सोन्याचे ओमपान, एक हजार रुपये किमतीची अर्धा ग्रॅम सोन्याची नथ असा एकूण १लाख ३४ हजार रुपये किमतीचे ६७ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या वस्तू चोरीस गेल्या आहेत. या प्रकरणी योगिता राहुल दाभाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Latha worth lakhs of jewelery worth lakhs of rupees from the woman's bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे