महापालिका निवडणुकीचा प्रचार थांबला, उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:19 PM2018-12-07T21:19:08+5:302018-12-07T21:19:33+5:30

मतदानाची तयारी पूर्ण : आज साहित्य वाटप 

The election of the municipal election stopped, the voting tomorrow | महापालिका निवडणुकीचा प्रचार थांबला, उद्या मतदान

महापालिका निवडणुकीचा प्रचार थांबला, उद्या मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या १० दिवसापासून सुरु असलेला प्रचार शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता संपला. रविवारी होणाºया मतदानाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाचे साहित्य घेऊन शनिवारी सायंकाळी सर्वच अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होतील.
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या १० दिवसापासून सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी सायंकाळी साडे पाच वाजता थांबली.
शक्ती प्रदर्शन - शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी शक्ती प्रदर्शन केले. काँग्रेस- राष्टÑवादी आघाडीतर्फे प्रभागातून प्रचार रॅली किंवा मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यात आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे सहभागी झालेत.
लोकसंग्रामतर्फे एकत्ररित्या प्रचार रॅली काढण्यात आली. त्यात १९ प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराच्या गाडया आणि शेवटी नदीकाठावरील झुलता पुलावर बसविण्यात येणारी शंकराची मूर्तीही ट्रॉलीवर आणण्यात आली होती. रॅलीत आमदार अनिल गोटे, माजी नगराध्यक्ष हेमा गोटे यांच्यासह सर्व उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.  भाजपतर्फे अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्यापासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यात माजी महापौर मंजुळा गावीत, डॉ.माधुरी बाफना यांच्यासह अन्य पदाधिकारी महिला सहभागी झाल्या होत्या. शिवसेनेतर्फे पेठ भागातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत खासदार संजय राऊत यांच्यासह सर्वच पदाधिकारी व उमेदवार सहभागी झाले होते. सायंकाळी साडे पाच वाजेनंतर सर्वच प्रचार तोफा थंडावल्यात. शहरातील बॅनर, झेंडे काढले - सर्वच पक्षाने आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी दुपारीच सर्वच बॅनर, झेंडे काढून घेतले. 

Web Title: The election of the municipal election stopped, the voting tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे