ढोल, ताशांच्या निनादात पालखी मिरवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:47 PM2019-04-19T22:47:03+5:302019-04-19T22:47:52+5:30

उत्साह :  टिपरी नृत्याने वेधले लक्ष; चौका-चौकात करण्यात आली पूजा

Drums, pancakes procession in front of the cards | ढोल, ताशांच्या निनादात पालखी मिरवणूक 

ढोल, ताशांच्या निनादात पालखी मिरवणूक 

Next
ठळक मुद्देउत्साह :  टिपरी नृत्याने वेधले लक्ष; चौका-चौकात करण्यात आली पूजा

धुळे : चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त श्री एकवीरादेवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टतर्फे शुक्रवारी सायंकाळी आदिशक्ती एकवीरादेवीची पालखी मिरवणूक ढोल, ताशांच्या निनादात वातावरणात काढण्यात आली. 
या पालखी मिरवणुकीत सहभागी भाविकांनी  ‘एकवीरा माता की जय’ चा जयघोष केला. चौका-चौकात भाविकांनी पालखी पूजन केले. तसेच पारंपरिक नृत्याविष्कारही सादर केले. यावेळी महिला सदस्यांनी सादर केलेल्या टिपरी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  प्रारंभी आदिशक्ती एकवीरा देवी मंदिरात पालखीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. सकाळी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव व  कमल गुरव यांच्या हस्ते झाले. दुपारी माध्यान्ह आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिर ट्रस्टच्या वतीने शिºयाचे वाटप करण्यात आले. 
आरतीला भाविकांची गर्दी 
शुक्रवारी, दुपारी १२ वाजता भगवतीच्या मंदिरात आरती झाली. या वेळी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. आरतीनंतर नवस फेडण्यासाठी सलग दुसºया दिवशी भाविकांची गर्दी दिसून आली. 
या मार्गावरून गेली मिरवणूक 
एकवीरादेवी मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक गल्ली क्रमांक चार, नेहरू चौक, पंचवटी टॉवर, मोठा पूल, नगरपट्टी, सहावी गल्लीमार्गे पुन्हा मोठ्या पुलावरून मंदिरापर्यंत काढण्यात आली.  

Web Title: Drums, pancakes procession in front of the cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे