‘लॉँग मार्च’साठी जाणाऱ्या पदाधिकारी दहिवेल येथून ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 04:12 PM2019-02-18T16:12:53+5:302019-02-18T16:21:01+5:30

पिंपळनेर येथून पुरूष-महिला कार्यकर्त्यांची पिंपळनेर येथे धरपकड

Dahiwal, the officer who went to Long March, was arrested | ‘लॉँग मार्च’साठी जाणाऱ्या पदाधिकारी दहिवेल येथून ताब्यात

‘लॉँग मार्च’साठी जाणाऱ्या पदाधिकारी दहिवेल येथून ताब्यात

Next
ठळक मुद्देचर्चेसाठी बोलवून पोलिसांनी घेतले ताब्यात, पदाधिका-यांचा आरोपपिंपळनेर येथे जमलेल्या शेकडो पुरूष, महिला आंदोलकांची धरपकडनाशिक येथून सुरू होणाºया लॉँग मार्चमध्ये सहभागापूर्वीच कारवाई

 दहिवेल : वनहक्क दावे निकाली काढून तत्काळ सातबारा उतारे द्या, दुष्काळ जाहीर करा यासह प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक येथून सुरू होणाºया लॉँग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी पिंपळनेर येथून धडक मोर्चाने जाणाºया आंदोलकांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप सत्यशोधक कष्टकरी सभेचे प्रमुख कॉ.किशोर ढमाले, कॉ.सुभाष काकुस्ते यांनी केला आहे. दरम्यान पिंपळनेर येथे मोर्चासाठी जमलेल्या कार्यकर्ते व शेतकºयांचीही धरपकड सुरू असल्याची माहितीही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वनहक्क दावे निकाली काढण्यासह संपूर्ण साक्री तालुका दुष्काळी जाहीर करा आदी मागण्यांसाठी किसान सभेसह सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे नाशिक ते मुंबई या लॉँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी पिंपळनेर येथून शेतकरी, कार्यकर्ते सोमवारी सकाळी ११ वाजता रवाना होणार होते. परंतु तत्पूर्वी पदाधिकाºयांना ताब्यात घेण्यात आले. तसेच पिंंपळनेर येथे जमलेल्या आंदोलकांना पकडण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा रवाना झाला होता. दरम्यान पिंपळनेर येथे जमलेल्या आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे.

Web Title: Dahiwal, the officer who went to Long March, was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.