धुळ्यात दोन गटातील वादानंतर परस्परविरोधी फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:20 PM2018-01-15T12:20:56+5:302018-01-15T12:21:44+5:30

श्रीराम नगरातील घटना : तलवार, काठ्यांचा सर्रास वापर

Contradictory suit in connection with the grouping of two groups in Dhule | धुळ्यात दोन गटातील वादानंतर परस्परविरोधी फिर्याद

धुळ्यात दोन गटातील वादानंतर परस्परविरोधी फिर्याद

googlenewsNext
ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारीशासकीय दूध डेअरी भागातील श्रीराम नगरातील घटनाघटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शासकीय दूध डेअरी भागातील श्रीराम नगरात शनिवारी क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली़  दोनही गटातील १८ जणांविरुध्द पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ 
एका गटातील निलेश शंकर काशिद (मराठे) याने धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार,  शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हाणामारीची घटना घडली़  खिशातून १ हजार २०० रुपये बळजबरीने काढून घेण्यात आले़ यात निलेश शंकर काशिद (मराठे) आणि योगेश शंकरराव मराठे यांना दुखापत झाली़ याप्रकरणी संशयित गिता (पुर्ण नाव माहित नाही), सोनी रोकडे, धुराबाई रोकडे, सुषमाबाई केदार, पिंटीबाई, आकाश घोडे, रितीक सोनवणे, लखन अहिरे, अजय घोडे, बाळासाहेब रोकडे, सागर अहिरे, कांचा उर्फ पवन झुलाल अहिरे यांच्याविरुध्द शनिवारी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 
तर, दुसºया गटातील सुरेखाबाई बाळासाहेब रोकडे या महिलेने दिलेल्या  फिर्यादीनुसार,   निलेश उर्फ छोट्या शंकर मराठे, योगेश शंकर मराठे, राहुल मराठे, सागर विलास मराठे, बिल्डर सोन्या (सर्व रा़ श्रीराम नगर, शासकीय दूध डेअरीमागे) यांच्याविरोधात भादंवि कलम ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ यासह अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलम नुसार गुन्हा दाखल झाला आहे़

Web Title: Contradictory suit in connection with the grouping of two groups in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.