धुळ्यात पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:43 AM2018-02-16T11:43:29+5:302018-02-16T11:44:24+5:30

शुक्रवारी पहाटेची कारवाई : एक जण ताब्यात

Combing operation of police in Dhule | धुळ्यात पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन

धुळ्यात पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन

Next
ठळक मुद्देशहरातील संवेदनशिल भागात पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशनअधिकाºयांसह १०० कर्मचारी तैनातगुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील संवेदनशिल भागात धुळे पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी पहाटे कोम्बिंग आॅपरेशन राबविले़ यात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले़ दरम्यान, या अचानक केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांवर दहशत निर्माण होत आहे़ याकामी स्थानिक गुन्हे शाखेचा सर्वाधिक पुढाकार होता़
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सतर्कता बाळगली जात आहेत़ 
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांच्या नेतृत्वाखाली कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले़ परिणामी सण उत्सवाच्या अनुषंगाने शहरासह जिल्ह्यात सर्तकता बाळगली जात असल्याचे समोर येत आहे़ 
शुक्रवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास पोलीस अधिकारी आणि विविध पोलीस ठाण्याचे मिळून १०० पोलीस कर्मचारी यांनी शहरातील कबीरगंज, सत्तारवाडा, वडजाई रोड यासह संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल भागात कोम्बिंग आॅपरेशन राबविले़ या विशेष मोहिमेत तडीपार गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला़ याशिवाय सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली़ विविध गुन्ह्यातील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे़ पुढील चौकशी सुरु आहे़ 

Web Title: Combing operation of police in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.