धुळे जिल्हयात बीटी बियाणे २० मे नंतर मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:49 AM2019-05-10T11:49:39+5:302019-05-10T11:50:44+5:30

जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर कापूस लागवड प्रस्तावित

 Bt seeds in Dhule district will be available after 20th May | धुळे जिल्हयात बीटी बियाणे २० मे नंतर मिळणार

धुळे जिल्हयात बीटी बियाणे २० मे नंतर मिळणार

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात खरीपाची तयारी सुरूकापूस लागवडीकडे शेतकºयांचा कलबीटी बियाण्यांची प्रतीक्षा

आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यात कापूस लागवडीकडे असलेला शेतकऱ्यांचा कल लक्षात घेता यावर्षी जवळपास सव्वा लाख बीटी कापूस बियाण्यांची पाकीटे उपलब्ध होणार आहे. १६ मे रोजी पुण्यात आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक होणार असून, त्यानंतरच बीटीची बियाणे मिळणार असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
जिल्ह्याचे खरीपाचे क्षेत्र ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, त्यापैकी २ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होईल, असे कृषी विभागाचे नियोजन आहे.
कापूस हे नगदी पीक असल्याने, शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे सर्वात जास्त कल आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने, कमी पावसातही कपाशीचे बºयापैकी उत्पन्न येत असल्याने, शेतकरी कापूस लागवडीलाच प्राधान्य देत असतात.
२०१९-२० या वर्षातील खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने केलेले आहे. त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडे बीटी, तसेच संकरित कापूस वाणांच्या बियाण्यांची मागणी करण्यात आलेले आहे. यात कपाशीची महाबीजकडून ११०० पाकीटे सुधारित वाणाचे व ११ हजार ५०० पाकीटे बीटीयुक्त कापूस बियाण्यांचे उपलब्ध होणार आहेत. खाजगी बियाणे उत्पादकांकडून १० लाख ४४ हजार पाकीटे उपलब्ध होणार असून, त्यात ९ हजार पाकिटे सुधारित वाणांची तर १० लाख ३५ हजार पाकीटे बीटीयुक्त कापसाचे पाकीटे उपलब्ध होणार आहेत.
येत्या १६ मे रोजी कृषी आयुक्तांच्या उपस्थितीत राज्याची खरीप हंगाम आढावा बैठक होणार आहे. त्यानंतरच बीटी कापूस बियाणे विक्रीचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे येत्या २० मे नंतरच शेतकºयांना बीटी कापूस बियाणे मिळू शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
दरम्यान काही ठिकाणी बीटी कापूस बियाण्यांची जादा दराने विक्री होत असते. यावर आळा बसावा म्हणून केंद्रातील कृषी व किसान कल्याण मंत्रालयाने ८ मार्च १९ रोजी बीटी कापूस बियाण्याचे दर निश्चित केले आहे. त्यानुसार बीजी-१ ६३५ व बीटी-२ ७३० रूपयांनी विक्री होईल असेही सांगण्यात आले.

 

Web Title:  Bt seeds in Dhule district will be available after 20th May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे