कचरा संकलनासाठी १७ कोटींची निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:33 PM2018-12-30T22:33:12+5:302018-12-30T22:37:17+5:30

महापालिका : कचरा संकलन व वाहतुकीचा तीन वर्षांसाठी ठेका, कचºयावर होणार प्रक्रिया

17 Crore Tender For Collection of Garbage | कचरा संकलनासाठी १७ कोटींची निविदा

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  महापालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या पार्श्वभूमीवर घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी संपूर्ण शहराकरीता एकच ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ त्यानुसार तीन वर्षांसाठी १७ कोटी ७९ लाख रूपयांची निविदा काढण्यात आली आहे़ 
चार भागांसाठी होता ठेका
मनपाने यापूर्वी चार भागांसाठी ठेका दिला होता़ परंतु वारंवार झालेल्या तक्रारींमुळे तीन भागांचा ठेका आधीच रद्द करण्यात आला आहे़ तर एका भागात ठेका पध्दतीने काम सुरु आहे़ नवीन ठेका दिल्यावर हा ठेका देखील रद्द करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले़ सद्यस्थितीत देवपूर भाग, मौलवीगंज-आझादनगर आणि मोगलाई-फाशीपूल या तीन भागांमध्ये मनपाच्या यंत्रणेकरून कचरा संकलन केले जाते़ त्यासाठी ठेका पध्दतीने वाहने व कामगार घेण्यात आले आहेत़ घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आता एकच ठेकेदार नेमून त्याला संपुर्ण शहराचा ठेका तीन वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ 
निविदा प्रक्रियेला सुरूवात
शहरातील कचरा संकलनासाठी १७ कोटी ७९ लाख १६ हजार ९१४ रुपयांची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे़ यामध्ये घरस्तरावरुन कचरा संकलन, गटारी व नाल्यातील गाळ संकलीत करुन तो कचरा डेपोवर नेणे या कामाचा समावेश आहे़ यात ओला व सुका कचरा वर्गीकरणाला प्राधान्य आहे़ निविदा २४ डिसेंबरला प्रसिध्द झाली असून २१ जानेवारीपर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे़ 
२५ कोटींचा ‘डीपीआर’ मंजूर
स्वच्छ महाराष्ट्र अभियानात हगणदरीमुक्ती व घनकचरा व्यवस्थापन या दोन प्रमुख घटकांचा समावेश झाला आहे़ या अभियानांतर्गत धुळे महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी २५ कोटी ८५ लाख १५ हजार रूपयांच्या निधीस मान्यता दिली असून  निधी ५०-५० टक्के दोन टप्प्यात वितरीत केला जाणार आहे़ सदर प्रकल्पासाठी मिळणारा निधी याच प्रकल्पावर खर्च करणे बंधनकारक असल्याने घनकचरा व्यवस्थापनाचा मार्ग यापूर्वीच मोकळा झाला आहे़ परंतु महापालिका निवडणूकीमुळे घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया लांबली होती़ 
कचरा विलगीकरणाचे बंधन
घनकचरा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी मनपावर सोपविली असून शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार अंमलबजावणी होणार  आहे़ 
शहरात निर्माण होणाºया घनकचºयापैकी किमान ९० टक्के घनकचरा निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून संकलित करणे बंधनकारक आहे़ 
विलगीकरण करण्यात आलेल्या ओल्या कचºयावर विकेंद्रीत पध्दतीने प्रक्रिया केली जाणार आहे़ त्यानुसार ओल्या कचºयापासून कंपोस्ट खत निर्मिती करणे अथवा त्यावर बायोमिथेनायझेशन पध्दतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे़ 
 सुक्या कचºयाचे पदार्थ पुनर्प्राप्ती सुविधा केंद्रावर दुय्यम विलगीकरण करण्याचे प्रस्तावित आहे़ या प्रक्रियेनंतरही कचरा शिल्लक राहिल्यास त्याची भराव भूमीवर विल्हेवाट लावणे बंधनकारक असणार आहे़ शिवाय वर्षानुवर्षे साठलेल्या कचºयाचे बायोमायनिंग करणे देखील बंधनकारक आहे़ 

Web Title: 17 Crore Tender For Collection of Garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे