बाळाच्या मृत्यूनंतर उस्मानाबादच्या शासकीय स्त्री रूग्णालयात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 04:42 PM2018-09-26T16:42:17+5:302018-09-26T16:43:23+5:30

शासकीय स्त्री रूग्णालयात प्रसुती झालेल्या एका महिलेच्या बाळाचा आज सकाळी मृत्यू झाला़

Tension in Osmanabad government women hospital after child's death | बाळाच्या मृत्यूनंतर उस्मानाबादच्या शासकीय स्त्री रूग्णालयात तणाव

बाळाच्या मृत्यूनंतर उस्मानाबादच्या शासकीय स्त्री रूग्णालयात तणाव

googlenewsNext

उस्मानाबाद : येथील शासकीय स्त्री रूग्णालयात प्रसुती झालेल्या एका महिलेच्या बाळाचा आज सकाळी मृत्यू झाला़ या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़

तालुक्यातील जाधववाडी येथील नेहा संतोष रणखांबे या महिलेला दोन दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी उस्मानाबाद येथील स्त्री रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ प्रसुतीनंतर महिलेला पुरूष जातीचे अर्भक झाले़ मात्र, आज सकाळी त्या बाळाचा मृत्यू झाला़ स्त्री रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता़ संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली होती़ जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी रूग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली़ तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा सूचना दिल्या़ आनंदनगर ठाण्यातील फौजदार दादासाहेब सिध्दे यांनी घटनास्थळी भेट दिली़

प्रकरणाची चौकशी
संतप्त नातेवाईकांची मागणी पाहता प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ राजाभाऊ गलांडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर मयत बाळाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी नेण्यात आले़

Web Title: Tension in Osmanabad government women hospital after child's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.