पोलीस भरतीमध्ये केलेल्या बदलाच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 07:33 PM2019-02-11T19:33:44+5:302019-02-11T19:35:24+5:30

पोलीस भरतीसाठी वर्षानुवर्ष तयारी करणाऱ्या युवकांवर अन्याय

The movement of the Bharipal Bahujan Mahasangh protested against the changes made in the recruitment of police | पोलीस भरतीमध्ये केलेल्या बदलाच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे आंदोलन 

पोलीस भरतीमध्ये केलेल्या बदलाच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे आंदोलन 

googlenewsNext

उस्मानाबाद : राज्य शासनाने पोलीस भरतीत केलेल्या बदलांच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़

आंदोलकांनी सांगितले की, राज्यभरातील  शेतकरी, गरिब, वंचित घटकातील मुले पोलीस भरतीतील १०० गुणांच्या शारीरिक चाचणीप्रमाणे तयारी करत आहेत़ परंतु शासनाने अचानक शारीरिक चाचणी ५० गुणांची केली आहे़ तसेच त्यात प्रथम लेखी परिक्षा घेतली आहे़ त्यामुळे पोलीस भरतीसाठी वर्षानुवर्ष तयारी करणाऱ्या युवकांवर अन्याय करणारा हा निर्णय आहे़ हा निर्णय शासनाने मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. 

यावेळी भारिपचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य मिलिंद रोकडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ता विकास बनसोडे, प्रा़ के़ टी़ गायकवाड, सुशिल बनसोडे, पंकज शिंदे, प्राक़े़टी़ गायकवाड, सुभाष वाघमारे, शहबाज काझी, रमेश गंगावणे, अलंकार बनसोडे, रवी बनसोडे, अक्षय पांडागळे, संतोषकुमार चौघुले, विशाल बनसोडे, सुधीर वाघमारे, शेखर बनसोडे, अमोल जानराव आदींची उपस्थिती होती़ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

Web Title: The movement of the Bharipal Bahujan Mahasangh protested against the changes made in the recruitment of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.