‘बापू’ भूतलावर या; देश मोदीमुक्त करा; मनसेतर्फे महात्मा गांधींच्या पुतळ्यास निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 07:03 PM2018-10-02T19:03:15+5:302018-10-02T19:04:29+5:30

वाढत्या महामार्गच्या निषेधार्थ गांधी जयंतीदिनी मनसेने उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे हे गांधीगिरी आंदोलन केले़.

'Bapu' please come; Free the country; MNS appealed to the statue of Mahatma Gandhi | ‘बापू’ भूतलावर या; देश मोदीमुक्त करा; मनसेतर्फे महात्मा गांधींच्या पुतळ्यास निवेदन

‘बापू’ भूतलावर या; देश मोदीमुक्त करा; मनसेतर्फे महात्मा गांधींच्या पुतळ्यास निवेदन

googlenewsNext

उस्मानाबाद : वाढत्या महामार्गाने देशातील जनता त्रस्त झाली असून, महागाई नियंत्रणात आणण्यात केंद्र, राज्य शासन अपयशी ठरले आहे़ त्यामुळे ‘बापूजी’ आपणच भूलोकावर येऊन क्रांतीचा संदेश द्यावा, देश मोदीमुक्त, राज्य फडणवीस मुक्त करावा, असे साकडे घालणारे निवेदन मनसेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ ठेवण्यात आले़.

वाढत्या महामार्गच्या निषेधार्थ गांधी जयंतीदिनी मनसेनेउस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे हे गांधीगिरी आंदोलन केले़. देशात, राज्यात महागाईचा भस्मासूर वाढला आहे़ शेतकरी आत्महत्या करीत आहेत़ पेट्रोल, डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत़ सर्वसामान्यांचे असे हाल असले तरी केंद्र, राज्य शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे़ सरकार हे व्यापारी, उद्योगपतींचे असून, सर्वसामान्य जनतेचा त्यांना विसर पडला आहे़ त्यामुळे ‘बापूजी, आपणच भूतलावर येऊन क्रांतीचा संदेश द्यावा, जुलमी सरकार बदलण्यासाठी मोदीमुक्त भारत व फडणवीस मुक्त महाराष्ट्र’ करण्याचा क्रांतीचा संदेश द्यावा’, अशा आशयाचे निवेदन मनसेच्या वतीने उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ ठेवण्यात आले़ मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात सौरभ देशमुख, बाबा क्षीरसागर, प्रेम आयवळे, नारायण साळुंके, अजित पेठे, राजकुमार चांदणे, समीर आरब यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़

Web Title: 'Bapu' please come; Free the country; MNS appealed to the statue of Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.