नारायणपूर येथे पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 11:27 AM2021-05-30T11:27:28+5:302021-05-30T11:27:40+5:30

Crime News : दारुड्या पतीने राहत्या घरात   पत्नीला केलेल्या   मारहाणीत पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू  झाल्याने   परिसर हादरला आहे.

Wife killed in husband's beating at Narayanpur | नारायणपूर येथे पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

नारायणपूर येथे पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क  
नांदुरा : तालुक्यातील नारायणपूर येथे  २८ मे च्या संध्याकाळी पाच वाजेदरम्यान दारुड्या पतीने राहत्या घरात   पत्नीला केलेल्या   मारहाणीत पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू  झाल्याने   परिसर हादरला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील गटग्रामपंचायत अवधा अंतर्गत येणाऱ्या ग्राम नारायणपूर येथील शेतमजूर आरोपी  विष्णू आत्माराम खैरे (वय ३६) याने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घरी येऊन पत्नी वर्षा विष्णू खैरे (३४) हिला मारहाण केली. 
घराचे दार उशिरा का उघडले, यावरून   वाद घालत तिला काठीने त्याने मारहाण केली. तसेच पलंगाच्या लोखंडी ठाव्यावर  तिचे डोके आदळून जिवे मारले. नांदुरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पती  विष्णू खैरे याला ताब्यात घेतले. याबाबत मृत महिलेचा भाऊ योगेश भास्कर बोबंटकार (रा. पळशी सुपो, ता. जळगाव जामोद)   यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी विष्णू आत्माराम खैरे याच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Wife killed in husband's beating at Narayanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.