हिंजवडी परिसरातून मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक , १५ दुचाकी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 07:20 PM2019-07-17T19:20:59+5:302019-07-17T19:21:17+5:30

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हिंजवडी व परिसरातून ५ लाख १५ हजारांच्या १५ मोटारसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले.

Two motorbike stolen arrested from the Hinjewadi area, 15 bikes were seized | हिंजवडी परिसरातून मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक , १५ दुचाकी जप्त

हिंजवडी परिसरातून मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक , १५ दुचाकी जप्त

Next
ठळक मुद्देतपास पथकाने केली कारवाई 

पिंपरी : हिंजवडी व परिसरातून मोटारसायकल चोरी करणाºया दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीच्या १५ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. दोन्ही आरोपींना शनिवारी (दि. १३) सायंकाळी जेरबंद करण्यात आले होते. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिन महेबुब शेख (वय २२, रा. श्रीरामनगर, पिंपळे निलख) व रियाझ सिकंदर शेख (वय २२, रा. खाटपे वाडी, भुकुम, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील कर्मचारी व अधिकारी शनिवारी (दि. १३) सायंकाळी गस्त घालत असताना आमिन महेबुब शेख व रियाझ सिकंदर शेख संशयितरित्या वावरताना आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मोटारसायकल चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी हिंजवडी व परिसरातून ५ लाख १५ हजारांच्या १५ मोटारसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. त्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. दोन्ही आरोपींवर हिंजवडी पोलीस ठाण्यात ५, भोसरी पोलीस ठाण्यात १, चंतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात २, चिंचवड पोलीस ठाण्यात १ असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. 
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिरुध्द गिजे, पोलीस उपनिरीक्षक वरूडे, तपास पथकातील पोलीस कर्मचारी महेश वायबसे, किरण पवार, विवेक गायकवाड, कुणाल शिंदे, आतिक शेख, हनुमंत कुंभार, सुभाष गुरव, विकी कदम, चंद्रकांत गडदे, झनक गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, आकाश पांढरे, अली शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Web Title: Two motorbike stolen arrested from the Hinjewadi area, 15 bikes were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.