मुंबई पोलिसांच्या ''मिशन  इम्पॉसिबल'' ट्वीट झाले ट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 09:31 PM2018-07-30T21:31:34+5:302018-07-30T21:32:10+5:30

मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी ट्विटर हॅण्डलवरून दिला संदेश 

 The troll of Mumbai Police's "Mission Impossible" tweeted | मुंबई पोलिसांच्या ''मिशन  इम्पॉसिबल'' ट्वीट झाले ट्रोल 

मुंबई पोलिसांच्या ''मिशन  इम्पॉसिबल'' ट्वीट झाले ट्रोल 

Next

मुंबई - अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी तसेच वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलीस नेहमी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून संदेश देतात. आज रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओव्दारे आवाहन किंवा कार्टून्सच्या माध्यमातून ट्विट केलं जात. मात्र, आज ''मिशन इम्पॉसिबल'' या लोकप्रिय चित्रपट मालिकेचा सहावा भाग “मिशन इम्पॉसिबल- फॉलआऊट” या चित्रपटातील व्हिडिओ वापरुन रस्ते सुरक्षाबाबत संदेश दिला आहे. या ट्वीटला लोकांच्या भरभरुन प्रतिसाद दिला आहे. काही लोकांनी याचे कौतूक केले आहे.  तर काही लोकांनी यावरुन वाहतूक पोलिसांना ट्रोल केले.

या व्हिडिओत चित्रपटाचा हिरो टॉम क्रूझ विनाहेलमेट बाईक चालवतो असतो. दुसऱ्याक्षणी त्याची गाडीचा अपघात होऊन तो रस्त्यावर पडतो. “अशाच प्रकारे जर तुम्ही बाईक चालवत रहिलात तर तुम्हच्याकडून दंड वसूल केला जाईल, आमच्यासाठी असे स्टंट थांबविणे इम्पॉसिबल नाही.” असा संदेश त्यांनी व्हिडिओद्वारे दिला आहे. 



 

Web Title:  The troll of Mumbai Police's "Mission Impossible" tweeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.