इंदापूर येथे अल्पवयीन मुलीला बलात्कार करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 06:00 PM2018-10-09T18:00:56+5:302018-10-09T18:05:02+5:30

अल्पवयीन मुलीला अडवत तिच्याशी अश्लील संभाषण करत बलात्कार करण्याची धमकी देण्यात आल्याची घटना इंदापूरमध्ये घडली आहे.

A threat to minor girl of raping in Indapur | इंदापूर येथे अल्पवयीन मुलीला बलात्कार करण्याची धमकी

इंदापूर येथे अल्पवयीन मुलीला बलात्कार करण्याची धमकी

googlenewsNext
ठळक मुद्देशाळेचा ड्रेस ओढून केली जबरदस्तीविनयभंगासह दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल

इंदापूर : अल्पवयीन मुलीला अडवत तिच्याशी अश्लील संभाषण करत बलात्कार करण्याची धमकी देण्यात आल्याची घटना इंदापूरमध्ये घडली आहे. पीडित मुलीच्या अंगावरील शाळेचा गणवेश ओढून जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न झाला असून या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी विनयभंगासह दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. 
आकाश चंद्रकांत भोई (रा. शहा, ता. इंदापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. इंदापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नववीमध्ये शिकत आहे. सोमवारी कांदलगाव येथे शाळेमध्ये चालली होती. चालत जात असताना डाळिंबाच्या शेताजवळ आरोपी भोई हा मोटार सायकलवरून पाठीमागे आला. मुलीसमोर थांबून तिच्याशी अश्लील संभाषण करून गैरवर्तन करू लागला. त्याने तिला ‘तुझे वडील कुठे आहेत? अशी विचारणा केली. त्यावर मुलीने ते रात्री बाहेर गेले होते, अद्याप घरी आलेले नसल्याचे सांगितले. आरोपीने तिला, ‘मी तुझ्यावर आता बलात्कार करतो. तुझ्या घरी कोण कोण आहे?’ अशी धमकी दिली. आरोपीने यावेळी तिच्या अंगावरील गणवेश पाठीमागून ओढला. 
घाबरलेली मुलगी त्याला धक्का देऊन तेथून पळाली. शाळेत न जाता घरी जाऊन आईस सर्व प्रकार सांगितला. आई व आत्या यांच्यासह पोलीस ठाण्यात जाऊन भोईविरुद्ध फिर्याद दिली. या घटनेमुळे इंदापूरमध्ये खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर करीत आहेत.

Web Title: A threat to minor girl of raping in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.