अट्टल चोरटे जेरबंद; चोरलेल्या 21 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 08:32 PM2019-02-12T20:32:14+5:302019-02-12T20:43:45+5:30

ठाणे आणि कळवा परिसरात या चोरांनी धुमाकूळ घातला होता. अखेर पोलिसांनी त्यांना गजाआड केले आहे.

Thirty-two armed robbers arrested in Thane; Police seized 21 stolen buses | अट्टल चोरटे जेरबंद; चोरलेल्या 21 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त

अट्टल चोरटे जेरबंद; चोरलेल्या 21 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त

ठळक मुद्दे चोरलेल्या गाड्या त्याने रत्नागिरी खेड येथील एका व्यक्तीला, एमआयडीसी येथील कामगारांना कमीत कमी किंमतीत विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे.ठाणे आणि कळवा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याचे पोलीस उपायुक्त स्वामी यांनी सांगितले.

ठाणे - ठाणे आणि कळवा परिसरातील 3 अट्टल दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरांकडून ८ लाख २५ हजार किंमतीच्या २१ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ठाणे आणि कळवा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याचे पोलीस उपायुक्त स्वामी यांनी सांगितले. ठाणे आणि कळवा परिसरात या चोरांनी धुमाकूळ घातला होता. अखेर पोलिसांनी त्यांना गजाआड केले आहे.

१ फेब्रुवारी रोजी पोलीस नाईक रोकडे, पोलीस शिपाई बच्छाव हे गस्त घालत असताना राजा मोबीज शेख (20) राहणारा नेरूळ सेक्टर 23 धारावे गाव नवी मुंबई, मूळगाव अमरूल अच्छा, जिल्हा हसनाबाद चाक पच्छिम बंगाल याला डुप्लिकेट चाव्या व स्क्रु ड्रायव्हरसह सिडको स्टँड येथे रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून त्याचा साथीदार गना बबलू पठाण (25) राहणार महादेव तांडेल इमारतीमधील रूम नंबर 8 सीवुड, नवी मुंबई या दोघांकडुन चोरी केलेल्या 11 दुचाकी वाहने अंदाजे किंमत 4,25,000/- रुपये हस्तगत केली. ही वाहने त्यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 3, पनवेल पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 2 असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहे. उर्वरित 6 गाड्यांचे इंजिन व चेसीस नंबरवरून मालकाचा शोध घेणे चालु आहे. आरोपी गना बबलू पठाण हा व्यवसायाने मॅकेनिक असून तो वाहन चोरल्यानंतर नंबरप्लेट व काही वाहनांचे इंजिन नंबरमध्ये फेरफार करून लोकांना 10 ते 15 हजार रुपयाला  विकत असे. तसेच कळवा पोलीस स्टेशनच्या गस्त पथकातील पोलीस शिपाई ढेबे हे गस्त घालत असताना आरोपी प्रशांत प्रकाश जुवळे (23) राहणार दिघा ठाणे हा संशयास्पदरित्या फिरताना आढळला. त्याची घेतली असता त्याच्याकडे वाहन चोरीसाठी लागणारे साहित्य मिळुन आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने कळवा पोलीस स्टेशन हद्दीतून 8 आणि मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 2 अशी 10 दुचाकी वाहन अंदाजे किंमत 10 लाख रुपये चोरल्याचे कबुल केले. हा आरोपी गाड्या विकताना लोकांना आरटीओ कार्यालयात जमा झालेल्या गाड्या मी सोडवून घेतो आणि त्या रिपेअर करून विकतो असे सांगायचा. चोरलेल्या गाड्या त्याने रत्नागिरी खेड येथील एका व्यक्तीला, एमआयडीसी येथील कामगारांना कमीत कमी किंमतीत विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. ह्या चोरीच्या गाडीमधील एक गाडी त्यानी स्वतः साठी ठेवली होती. 

ठाणे पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस .स्वामी यांनी लोकांना आवाहन केले आहे की, आपल्या दुचाकी गाड्या पार्किंग लॉटमध्येच पार्क कराव्या, त्यांना चांगल्या प्रकारचे लॉक बसवावे, जीपीएस सिस्टीम बसवावे जेणेकरून गाड्या चोरीला जाणार नाहीत. तसेच जर कोणी तुम्हाला 50 ते 60 हजाराची गाडी 10 ते 15 हजाराला विकत असेल तर त्यांच्याकडून अशा गाड्या विकत घेऊ नका ते तुम्हाला आरटीओने पकडलेल्या गाड्या आहेत. बँकेने खेचून आणलेल्या गाड्या आहेत. अशा थापा मारतील पण अशा भूलथापानां भुलून गाड्या घेऊ नका. तसेच अशी लोक गाड्या विकण्यासाठी तुमच्याकडे आली तर लगेच त्यांची माहिती पोलिसांना कळवा. 

Web Title: Thirty-two armed robbers arrested in Thane; Police seized 21 stolen buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.