भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 03:23 PM2018-10-12T15:23:56+5:302018-10-12T15:24:53+5:30

चव्हाण यांची हत्या झाल्यापासून नितीन फरार झाला होता. या प्रकरणात तो प्रमुख संशयित होता. त्याला नालासोपारा पोलिसांनी काल लातूरहून ताब्यात घेतले आहे. 

Suspended accused in the murder of BJP woman office bearer | भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी ताब्यात

भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी ताब्यात

नालासोपारा - भाजप पदाधिकारी रुपाली चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी नितीन चाफे नावाच्या एका तरुणाला लातूरहून ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रुपाली चव्हाण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. त्यांच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. त्यांना इस्त्रीचे चटकेही देण्यात आले होते. चव्हाण यांची हत्या झाल्यापासून नितीन फरार झाला होता. या प्रकरणात तो प्रमुख संशयित होता. त्याला नालासोपारा पोलिसांनी काल लातूरहून ताब्यात घेतले आहे. 

या हत्येमुळे राजकीय वर्तुळात तसेच परिसरात खळबळ  उडाली होती. मृत महिला सत्ताधारी पक्षाची पदाधिकारी असल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. नालासोपारा पश्चिमेकडील तपस्या अपार्टमेंटच्या बी विंग़मध्ये रूम नंबर १०१ मध्ये रूपाली चव्हाण राहत होत्या. त्या घटस्फोटित होत्या. चव्हाण यांचे वडील जवळच राहत होते. त्यांच्याजवळच रुपालीचा यांचा मुलगा राहत होता आणि रुपाली यांनी आपल्या घरी नितीन चाफे नावाच्या तरुणाला पेईन्ग गेस्ट म्हणून राहण्यास जागा दिली होती अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

धक्कादायक!... इस्त्रीचे चटके आणि विजेचा शॉक देऊन भाजप महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

Web Title: Suspended accused in the murder of BJP woman office bearer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.