कांद्याच्या नावाखाली रक्तचंदनाची तस्करी, DRI ने केले ४ कोटींचे घबाड हस्तगत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 05:00 PM2020-06-17T17:00:37+5:302020-06-17T17:14:01+5:30

कांद्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने शारजात निर्यात करण्याच्या तयारीत असतानाच हा माल पकडण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Smuggling of Red sandalwood under the name of onion, DRI seized Rs 4 crore's Red sandalwood | कांद्याच्या नावाखाली रक्तचंदनाची तस्करी, DRI ने केले ४ कोटींचे घबाड हस्तगत 

कांद्याच्या नावाखाली रक्तचंदनाची तस्करी, DRI ने केले ४ कोटींचे घबाड हस्तगत 

Next
ठळक मुद्देजेएनपीटी बंदरातून एका कंटेनर कार्गोमधुन शारजा-युएई येथे २९ मेट्रिक टन कांदा पाठविण्यात येणार होतायाप्रकरणी अधिकाऱ्यांकडून कसून तपासणी सुरू असल्याने सीएफएसचे नाव उघड करण्यास डीआरआय अधिकाऱ्यांनी नकार दिला.

उरण : जेएनपीटी बंदरातून न्हावा- शेवा डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी छापा टाकून १३ मेट्रिक टन रक्त चंदनाच्या साठा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत चार कोटीच्या घरात आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे. कांद्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने शारजात निर्यात करण्याच्या तयारीत असतानाच हा माल पकडण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


जेएनपीटी बंदरातून एका कंटेनर कार्गोमधुन शारजा-युएई येथे २९ मेट्रिक टन कांदा पाठविण्यात येणार होता. तशी कागदपत्रेही तयार करण्यात आली होती. मात्र कांद्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने दुर्मीळ रक्तचंदनाची तस्करी करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती न्हावा-शेवा येथील डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. खबऱ्यांकडून बातमी मिळाल्यानंतर डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून संशयित कंटेनर कार्गोची तपासणी केली. या तपासणीत २९ मेट्रिक टनाऐवजी फक्त १७ टन कांदा आढळून आला. तर कंटेनरमध्येच कापडात गुंडाळून लपवुन ठेवलेला १३ मेट्रिक टन रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या रक्तचंदनाच्या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चार कोटीच्या घरात आहे. याप्रकरणी डीआरआय अधिकाऱ्यांनी रक्तचंदनाची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयितांना अटक केलीे. त्याना तपासणीसाठी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अधिकाऱ्यांकडून कसून तपासणी सुरू असल्याने सीएफएसचे नाव उघड करण्यास डीआरआय अधिकाऱ्यांनी नकार दिला.

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

 

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल

 

लिपिकाचा प्रताप, महापालिकेत सव्वा तीन लाखाची अफरातफर 

Web Title: Smuggling of Red sandalwood under the name of onion, DRI seized Rs 4 crore's Red sandalwood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.