Shraddha Murder Case: निर्दयी! श्रद्धाचे 35 तुकडे करणारा 'तो' शांतपणे झोपला; आफताबचा जेलमधील Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 12:08 PM2022-11-16T12:08:36+5:302022-11-16T12:27:32+5:30

Shraddha Murder Case: आफताब जेलमध्ये असून त्याला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात दरम्यान त्याचा जेलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.

Shraddha Murder Case aftab amin poonawalla seen sleeping in jail after shraddha walke murder cut into pieces | Shraddha Murder Case: निर्दयी! श्रद्धाचे 35 तुकडे करणारा 'तो' शांतपणे झोपला; आफताबचा जेलमधील Video व्हायरल

Shraddha Murder Case: निर्दयी! श्रद्धाचे 35 तुकडे करणारा 'तो' शांतपणे झोपला; आफताबचा जेलमधील Video व्हायरल

googlenewsNext

मुंबईच्या कॉल सेंटरमध्ये दोघांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात इतके अडकले की, घरच्यांनी विरोध केल्यावर ते दिल्लीला पळून गेले, पण एके दिवशी भांडण झाले आणि मुलाने मुलीच्या शरीराचे 35 तुकडे केले. हत्येची ही खळबळजनक घटना दिल्लीतील मेहरौली परिसरातून समोर आली आहे. हत्येची ही कहाणी 6 महिन्यांपूर्वीची आहे आणि यामध्ये आफताब असे आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर आता आफताबचा जेलमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

आफताब जेलमध्ये असून त्याला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात दरम्यान त्याचा जेलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आफताब जमिनीवर शांतपणे झोपलेला पाहायला मिळत आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणात आफताबची चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात कोणताच खेद जाणवला नाही. त्याला या गोष्टीचा पश्चाताप देखील नसल्याचं समोर आलं आहे. 

पोलिसांनी अटक केल्यावर आफताब एकदाच रडला. आफताबचे वडील अमीन पुनावाला कोठडीत त्याची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी आफताबच्या डोळ्यात अश्रू होते अशी माहिती समोर आली आहे. आफताबचा जेलमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  एका डॉक्टरने आफताबसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेन दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमधील जनरल सर्जन असणारे डॉक्टर अनिल सिंह यांनी आफताब मे महिन्यामध्ये आपल्याकडे आला होता असं सांगितलं आहे. "मे महिन्यामध्ये तो माझ्या दवाखान्यात आला होता. त्याच्या उजव्या हाताच्या तळहाताजवळ जखम झाली होती आणि त्यासाठी टाके घालावे लागले होते. तो अस्वस्थ आणि आक्रमक दिसत होता" असं डॉक्टर अनिल यांनी सांगितलं. 

 श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताबच्या हाताला झाली जखम?

जखम कशी झाली याबद्दल डॉक्टर अनिल यांनी विचारलं असता फळं कापताना जखम झाली असं त्याने सांगितलं आणि निघून गेला. "तो फार आत्मविश्वास असल्यासारखं भासवत होता. एखाद्याची हत्या करुन तो आला आहे असं त्याच्या देहबोलीवरुन वाटत नव्हतं. तो इंग्रजीमध्ये बोलत होता. आफताबला झालेली जखम फार गंभीर नव्हती असंही डॉक्टरांनी सांगितलं. एकीकडे तो फार आत्मविश्वास दाखवत होता तरी त्याच्या बोलण्यातून अस्वस्थपणा जाणवत होता. आपण मुंबईहून दिल्लीत कामासाठी आलो आहोत, आयटी सेक्टरमध्ये काम करतो, चांगल्या पगारासाठी मुंबई सोडून दिल्लीत आलो आहोत असंही त्याने डॉक्टारांना सांगितलं.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Shraddha Murder Case aftab amin poonawalla seen sleeping in jail after shraddha walke murder cut into pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.