Video : धक्कादायक ! मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा गोरखधंदा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 04:59 PM2018-11-02T16:59:14+5:302018-11-02T16:59:48+5:30

कारमध्ये लाकडी मुठ असलेला सूर आढळून आला. तसेच विशेष म्हणजे कारमध्ये प्रेस आणि पोलीस लिहिलेली पाटी पोलिसांना सापडली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७० (३)सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३,४,५ आणि भारतीय हत्यार अधिनियम कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करून ४ जणांना अटक केली आहे. 

Shocking Prostitution business in the name of massage parlor | Video : धक्कादायक ! मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा गोरखधंदा 

Video : धक्कादायक ! मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा गोरखधंदा 

googlenewsNext

मुंबई - भाईंदर पूर्व येथे निरा कॉम्प्लेक्सच्या दुकान क्रमांक ८ येथे मॉडर्न फॅमिली सलून येथे मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार भाईंदर विभागाचे सहाय्य्क पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून छापा टाकून हा गोरखधंदा उघड केला आहे. 

 २ महिला सलून मालक असून त्या सालूंच्या नावाखाली पुरुषांना मुली पुरवत असल्याचे आढळून आले. छाप्यादरम्यान ४ मुली वेश्याव्यवसायाकरिता सलूनमध्ये होत्या. सालूंच्या आतील भागात रम लांबवुन तेथे वेश्याव्यवसाय चालत असल्याचे समोर आले आहे. वेश्या व्यवसायसाठी मुलींना आणण्या आणि नेण्यासाठी वापरण्यात येणारी शेवर्लेत कंपनीची कार (एमएच ०२ डीएन २८९०) आणि टीव्हीएस स्कुटर (एमएच ०४ जेआर ७३०५) हस्तगत करून त्याची झडती घेण्यात आली. या कारमध्ये लाकडी मुठ असलेला सूर आढळून आला. तसेच विशेष म्हणजे कारमध्ये प्रेस आणि पोलीस लिहिलेली पाटी पोलिसांना सापडली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७० (३)सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३,४,५ आणि भारतीय हत्यार अधिनियम कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करून ४ जणांना अटक केली आहे. 

jpg

Web Title: Shocking Prostitution business in the name of massage parlor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.