बलात्कार करून हत्या करणारा अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 07:24 AM2022-12-16T07:24:59+5:302022-12-16T07:25:08+5:30

कल्याण स्टेशन परिसरातील एका इमारतीच्या आवारात १ डिसेंबर रोजी नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला.

Rape and murder finally jailed | बलात्कार करून हत्या करणारा अखेर जेरबंद

बलात्कार करून हत्या करणारा अखेर जेरबंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेकरिता आरोपी सूरज ऊर्फ वीरेंद्र मिश्रा (वय ३२) याला महात्मा फुले पोलिसांनी अखेर १४ दिवसांनंतर अटक केली. मिश्रा मूळचा मध्य प्रदेश येथील दिवा गावचा राहणारा आहे.  

कल्याण स्टेशन परिसरातील एका इमारतीच्या आवारात १ डिसेंबर रोजी नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला. मिश्रा हा १ डिसेंबरच्या पहाटे बदलापूरहून गाडी पकडून कल्याण स्टेशन परिसरात आला. त्याची रस्त्यावर राहत असलेल्या कुटुंबावर नजर गेली. एक अल्पवयीन मुलगी तिच्या आई-वडिलांच्या जवळ रस्त्यावर झोपल्याचे पाहून आरोपी मिश्राने मुलीला उचलून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व तिची गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी अल्पवयीन संशयित मुलास ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर सोडून दिले.

अल्पवयीन मुलालाही केले होते लक्ष्य
मिश्रा याने कल्याणच्या भानुसागर चित्रपटगृह परिसरात २०१३ मध्ये एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणात त्याची तुरुंगात रवानगी  झाली होती. या प्रकरणातून तो अलीकडेच सुटून आला होता. आता त्याने अल्पवयीन मुलीला लक्ष्य केले. गुन्हा करून त्याने भिवंडी गाठली. 

यांनी बजावली महत्त्वपूर्ण कामगिरी
अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांनी तपास पथके नेमली होती. सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे आणि हरिदास बोचरे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्याने आरोपी गजाआड झाला.

Web Title: Rape and murder finally jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.