राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 07:10 PM2019-04-30T19:10:08+5:302019-04-30T19:10:34+5:30

सध्या हायकोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

Raj Thackeray's CID inquiry; Petition filed in Bombay High Court | राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देमाजी पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. राज ठाकरेंनी देशावर मोठा दहशतवादी हल्ला होऊन युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं भाकीत केलं होतं.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात हायकोर्टात याचिका करण्यात आली असून याचिकेत सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन ही याचिका करण्यात आली आहे. माजी पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे. मात्र, हायकोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राज ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवून सीआयडी चौकशी करा अशी मागणी एस बालाकृष्णन यांनी याचिकेत केली आहे. राज ठाकरेंनी देशावर मोठा दहशतवादी हल्ला होऊन युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं भाकीत केलं होतं. यानंतरच पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मात्र सध्या हायकोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.



 

Web Title: Raj Thackeray's CID inquiry; Petition filed in Bombay High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.