The police have shown to the junky youth | पोलिसांनी मस्करी करणाऱ्या तरुणाला दाखविल्या खाक्या      
पोलिसांनी मस्करी करणाऱ्या तरुणाला दाखविल्या खाक्या      

ठळक मुद्देवालिव पोलीस ठाण्याच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर रात्री एका व्यक्तीचा फोन आला. या खट्याळ तरुणाचं नाव शिवकुमार गौतम असं आहे.माझे मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील तुंगारफाटा येथे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले आहे, अशी माहिती शिवकुमार गौतम नावाच्या व्यक्तीने दिली.

वसई - एका तरूणाने मस्करी करत चक्क पोलिसांना स्वत:चे अपहरण केल्याची खोटी माहिती दिली. पोलिसांनी खोटी माहिती देऊन फसविणाऱ्या या भामट्याला पॉलिसी खाक्या दाखवत बेड्या ठोकल्या आहेत. एवढेच नाही तर १ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. जर ही दंडाची रक्कम त्याने भरली नाही तर त्याला तीन दिवसाच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. या खट्याळ तरुणाचं नाव शिवकुमार गौतम असं आहे.

वालिव पोलीस ठाण्याच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर रात्री एका व्यक्तीचा फोन आला. माझे मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील तुंगारफाटा येथे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले आहे, अशी माहिती शिवकुमार गौतम नावाच्या व्यक्तीने दिली. फोन करताना त्याने खूप घाबरल्याचेही  नाट्य देखील केले. हे प्रकरण गंभीर असल्याचे पोलिसांना वाटल्याने त्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तिथे कुणीही आढळले नाही. नंतर फोन करणाऱ्या शिवकुमार याचाही मोबाईल बंद झाला होता. तरी पोलिसांनी संबंधित परिसर पिंजून काढला आणि अनेक ठिकाणी चौकशी केली. मात्र, शिवकुमार पत्ता लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून गौतमच्या घरचा पत्ता काढला. पोलीस जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा शिवकुमार घरात झोपलेला आढळला. मजा मस्ती म्हणून असा फोन केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ताबडतोब पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला एक हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास तीन दिवसाच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. 


Web Title: The police have shown to the junky youth
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.