पुण्यातील फुलेनगर येथे लष्कराच्या वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 12:33 PM2019-03-06T12:33:32+5:302019-03-06T12:36:32+5:30

आळंदी रोड चौकीसमोर अपघात करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेण्यात आले...

A persons death in accident at Fule Nagar in Pune | पुण्यातील फुलेनगर येथे लष्कराच्या वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी जागीच ठार

पुण्यातील फुलेनगर येथे लष्कराच्या वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी जागीच ठार

Next

पुणे: लष्कराच्या वाहनाने बीआरटी पादचाऱ्याला दिलेल्या जोरदार धडकेत जागीच ठार झाल्याची घटना रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. आळंदी रस्त्यावरील फुलेनगर बीआरटी बसस्टाँप जवळ हा अपघात झाला. गोपाळ मारुती सात्रे (वय ३५,रा.आदर्श इंदिरानगर, येरवडा) यांचा या अपघातात जागीच म्रृत्यू झाला. 
पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलेनगर बीआरटी मार्गात अपघात झाल्याची माहिती पोलीास नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली होती. तात्काळ विश्रांतवाडी पोलिस घटनास्थळी रवाना झाले.बीआरटी मार्गातील फुलेनगर बसस्टाँपच्या शेजारील भिंतीलगत एक इसम गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेला होता.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा इसम हा बीआरटी मागार्तून रस्ता ओलांडत असताना लष्कराच्या वाहनाने जोरदार धडक दिली. चाक डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.अपघात करुन सदरचे वाहन पुढे निघून गेले. आळंदी रोड चौकीसमोर अपघात करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेण्यात आले. गोपाळ सात्रे हे पेंटरचे काम करत आहे. त्याच्या घरी पत्नी, आई, दोन भाऊ व दोन मुली असा परिवार आहे. 
घटनास्थळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त देविदास पाटिल,पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड,वाहतुक शाखेचे सहाय्यक निरीक्षक संतोष गोरे यांनी भेट दिली. सात्रे यांचा म्रृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

Web Title: A persons death in accident at Fule Nagar in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.