चौघांच्या हत्याकांड प्रकरणात आरोपींच्या वकीलांकडून युक्तीवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 07:11 PM2018-09-19T19:11:19+5:302018-09-19T19:13:31+5:30

अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाखराबाद येथे शेतीच्या वादातून माळी कुटुंबातील चौघांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात आरोपींच्या वकीलांनी बुधवारी तिसरे सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात युक्तीवाद केला.

In the murder of the four, the argument of the accused lawyers | चौघांच्या हत्याकांड प्रकरणात आरोपींच्या वकीलांकडून युक्तीवाद

चौघांच्या हत्याकांड प्रकरणात आरोपींच्या वकीलांकडून युक्तीवाद

googlenewsNext
ठळक मुद्दे योगेश व राजेश माळीने त्याची तक्रार उरळ पोलिसात केली होती. तीनही आरोपींना विश्वनाथ माळी यांच्या घरी जाऊन योगेशचा भाउ राजेश माळीवर हल्ला केला, लगेच समोरुन येणाऱ्या विश्वनाथ माळी यांच्यावरही हल्ला चढविण्यात आला. या दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला.


अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाखराबाद येथे शेतीच्या वादातून माळी कुटुंबातील चौघांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात आरोपींच्या वकीलांनी बुधवारी तिसरे सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात युक्तीवाद केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. ही घटना १४ एप्रिल २0१४ रोजी घडली होती.
बाखराबादचे पोलीस पाटील दत्ताराम विश्वनाथ माळी यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे चुलतभाऊ राजेश व योगेशचे वडील भगवंतराव माळी यांनी आरोपी गजानन माळी याच्याशी दोन एकर शेती खरेदीचा व्यवहार केला होता; परंतु गजाननने इसार करण्यास नकार दिला. त्यामुळे भगवंतरावांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आणि न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. त्यामूळे घटनेच्या आठ दिवसांपूर्वी भगवंतरावांना शेतीचा ताबा मिळाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आरोपी गजानन माळी याने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. योगेश व राजेश माळीने त्याची तक्रार उरळ पोलिसात केली होती. तक्रार करून दोघेही भाऊ बाखराबादला काका विश्वनाथ माळी यांच्याकडे गेले होते. राजेश घरीच थांबला आणि योगेश व चुलत बहीण वनमाला रोकडे हे पुन्हा शेतात गेले. त्यांच्याच पाठोपाठ आरोपी गजानन माळी व त्याचे दोन मुले नंदेश व दीपक हे कडबा कटरचे पाते व कुºहाड घेऊन शेतात गेले. त्यानंतर योगेश माळी व वनमाला रोकडे यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर तीनही आरोपींना विश्वनाथ माळी यांच्या घरी जाऊन योगेशचा भाउ राजेश माळीवर हल्ला केला, लगेच समोरुन येणाऱ्या विश्वनाथ माळी यांच्यावरही हल्ला चढविण्यात आला. या दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी उरळ पोलिसांनी गजानन माळी, नंदेश माळी व दिपक माळी या तिघांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२, ४५२, १२0 ब(३४) नुसार दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर या प्रकरणाची तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असून बुधवारी आरोपींच्या वकीलांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात पुढील सुनावणी २६ सप्टेंबर रोजी राहणार आहे.

Web Title: In the murder of the four, the argument of the accused lawyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.