Jammu Kashmir: G-20 बैठकीपूर्वी घाटीत कारवाईला वेग, NIA ने जैशच्या दहशतवाद्याला घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 05:03 PM2023-05-21T17:03:21+5:302023-05-21T17:09:24+5:30

Jammu Kashmir: 22 मे रोजी होणाऱ्या G-20 बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये कारवाईला वेग आला आहे.

Jammu Kashmir: Ahead of G-20 meeting, NIA arrests Jaish terrorist in Kashmir Valley | Jammu Kashmir: G-20 बैठकीपूर्वी घाटीत कारवाईला वेग, NIA ने जैशच्या दहशतवाद्याला घेतलं ताब्यात

Jammu Kashmir: G-20 बैठकीपूर्वी घाटीत कारवाईला वेग, NIA ने जैशच्या दहशतवाद्याला घेतलं ताब्यात

googlenewsNext

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये G-20 ची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एजन्सीने दहशतवादी कट प्रकरणात जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद उबेद मलिक असे या दहशतवाद्याचे नाव असून, तो कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पाकिस्तानस्थित कमांडरला सैनिक आणि सुरक्षा दलांच्या हालचालींची गुप्त माहिती देत ​​होता, असे तपासात समोर आले आहे. एनआयने रविवारी ही माहिती दिली. 

दहशतवादी उबेदच्या ताब्यातून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार, तो मोठा दहशतवादी कट राबवण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने 2022 च्या जुनमध्ये एनआयएने खोऱ्यातील दहशतवादी कारस्थानासंदर्भात एफआयआर नोंदवला होता. यात खोऱ्यातील वेगवेगळ्या दहशतवादी संघटना पाकिस्तानी कमांडरच्या मदतीने भारतात ड्रग्ज, हवाला, शस्त्रे, आयईडी, रिमोट कंट्रोल ऑपरेटेड स्टिकी बॉम्ब आणि मॅग्नेटिक बॉम्ब आणत असल्याचा उल्लेख होता.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानातून ड्रोनद्वारे आयईडी आणि स्फोटके भारतात सातत्याने पाठवून स्थानिक पातळीवर एकत्र केली जात होती. याचा वापर सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी आणि खोऱ्यातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यासाठी केला जात होता. हे दहशतवादी सोशल मीडिया अॅप्सवर कोड वर्डमध्ये बोलून कट रचत होते. 

उद्या म्हणजेच 22 मे रोजी श्रीनगरमध्ये G20 बैठक होणार आहे. त्याआधी जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ही बैठक 24 मे पर्यंत चालणार आहे. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सीमा सुरक्षा दलाच्या विशेष जल शाखेने चिनाब नदीकाठी बोटींसह गस्त वाढवली आहे. 
 

Web Title: Jammu Kashmir: Ahead of G-20 meeting, NIA arrests Jaish terrorist in Kashmir Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.