अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष भोवले ; तीन पोलीस हवालदार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 03:39 PM2019-03-14T15:39:14+5:302019-03-14T15:40:03+5:30

अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण पोलीस दलातील तिघा पोलीस हवालदारांना चांगलेच भोवले आहे़.

Ignore illegal businesses ; Three police constable suspended | अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष भोवले ; तीन पोलीस हवालदार निलंबित

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष भोवले ; तीन पोलीस हवालदार निलंबित

Next

पुणे : अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण पोलीस दलातील तिघा पोलीस हवालदारांना चांगलेच भोवले आहे़. त्यांच्या हद्दीत अवैध धंदे चालू असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना निलंबित केले़. 
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमिरुद्दीन रफीरद्दीन चमनशेख, लोणीकंद पोलीस ठाण्याचे हवालदार डी़ सी़ बेंद्रे व डी़ एऩ गायकवाड अशी त्यांची नावे आहेत़. 
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयसीआयसी बँकेसमोरील सुखकर्ता एंटरप्रायझेस दुकानाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करुन ३० हजार ६७० रुपयांची जुगाराची साधने जप्त केली़. तसेच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली बीट अंतर्गत वाघोली गावातील खांदवेनगर येथे पत्र्याच्या शेडलगत जुगारावर छापा घातला होता़. कल्याण मटका चालविणाऱ्या ६ जणांविरुद्ध कारवाई करुन १३ हजार ८१० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले होते़. 
या अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली़. त्यात या तीन कर्मचाऱ्यांनी या धंद्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्यात गंभीर स्वरुपाची दिरंगाई केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन निलंबित करण्यात आले आहे़. 
अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध यापुढे कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे धोरण राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत़. 

Web Title: Ignore illegal businesses ; Three police constable suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.