लग्नपत्रिकेत नाव टाकण्यावरून पतीने पत्नीची केली हत्या ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 12:40 PM2019-04-27T12:40:53+5:302019-04-27T12:41:16+5:30

या घटनेनंतर आरोपी पती मोहन गुरुनाथ महाजन (५२) फरार झाला आहे.

Husband has murdered wife murdered due to reason of names on marriage invitation card | लग्नपत्रिकेत नाव टाकण्यावरून पतीने पत्नीची केली हत्या ?

लग्नपत्रिकेत नाव टाकण्यावरून पतीने पत्नीची केली हत्या ?

ठळक मुद्दे कल्याणच्या ठाणकरपाडा परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पती मोहन महाजन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलापुढील तपास सुरू केला आहे. 

कल्याण -  मुलीच्या लग्नपत्रिकेत नावं टाकण्यावरुन वाद झाल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याच्या संशयावरून परिसरात  खळबळजनक घटना समोर आली आहे. वधूच्या बापाने मुलीवरही चाकूने वार केले. या चाकू हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. कल्याणच्या ठाणकरपाडा परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर आरोपी पती मोहन गुरुनाथ महाजन (५२) फरार झाला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पती मोहन महाजन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला आहे. मोहनच्या मुलीचे लग्न ठरले होते मुलीच्या लग्नपत्रिकेवर नाव टाकण्यावरून झालेल्या वादातून त्याने हे कृत्य केले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

मनीषा महाजन (४५) असं मृत महिलेचे नाव आहे. मुलगी जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. बाजारपेठ पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.कल्याण येथील पश्चिम ठाणकर पाडा परिसरात मोहन महाजन आपली पत्नी मनीषा व मुलगी गौरवी सोबत राहत होता. मोहन हा रिक्षा चालक आहे. मोहनची मुलगी गौरवी हिचे लग्न ठरले होते. गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोहनचा पत्नी सोबत वाद झाला याच वादातून संतापलेल्या मोहनने चाकूने पत्नी मनीषा व मुलगी गौरवीवर हल्ला केला. या पत्नी मनीषा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगी गौरवी ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात मोहनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Husband has murdered wife murdered due to reason of names on marriage invitation card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.