लातूरात पाच लाखांच्या घरफाेडीचा झाला उलगडा, अट्टल गुन्हेगार जाळ्यात

By राजकुमार जोंधळे | Published: December 5, 2022 05:34 PM2022-12-05T17:34:40+5:302022-12-05T17:35:04+5:30

पाेलिसांचा तिघांना हिसका, राेख रक्कम आणि साेन्याचे दागिने हस्तगत

House robbery worth 5 lakhs was solved in Latur, adamant criminal in the net | लातूरात पाच लाखांच्या घरफाेडीचा झाला उलगडा, अट्टल गुन्हेगार जाळ्यात

लातूरात पाच लाखांच्या घरफाेडीचा झाला उलगडा, अट्टल गुन्हेगार जाळ्यात

Next

लातूर: रात्रीच्या वेळी घर फाेडणाऱ्या टाेळीतील तिघांच्या पाेलिस पथकाने साेमवारी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून राेख रक्कम आणि साेन्याचे दागिने असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गाेपाळ किशन मद्दे (वय ५९, रा. भडी, ता. जि. लातूर) यांच्या घराच्या गेटचे कुलूप, लाेखंडी पट्टी ताेडून आत प्रवेश केला. दरम्यान, घरातील किचनरुमच्या दाराचे कुलूप ताेडत कपाटाचे दार वाकडे करून साेन्याचे दागिने, राेख रक्कम असा ४ लाख ८९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला हाेता. दरम्यान, ही घटना ९ सप्टेंबर २०२२ राेजी रात्री २.१५ वाजता घडली हाेती. याबाबत लातूर ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. तपास पाेलिस निरीक्षक गणेश कदम यांनी करून पाेलिस उपनिरीक्षक तानाजी पाटील यांच्याकडे दिला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक प्रतिभा ठाकूर, पाेहेकाॅ. सय्यद, पाेना. सचिन चंद्रपाटले, राहुल दराेडे, खंडागळे, दत्ता गिरी, अक्षय डिगाेळे, अंमलदार जाधव, चालक हजारे, वाघे यांच्या पथकाने केली आहे.

खबऱ्याने दिली टीप अन् अट्टल गुन्हेगार अडकले...

घरफाेडीतील आराेपींच्या शाेधासाठी पथक फिरत हाेते. दरम्यान, खबऱ्याने टीप दिली आणि शिवमणी संताेष भाेसले (वय २१, रा. जनवाडी, ता. भालकी, जि. बिदर ह.मु. तरकारी बाजार, निलंगा), अजय व्यंकट शिंदे (वय २१, सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर) आणि विजय बब्रु भाेसले (वय २१ रा. घाटशिल राेड, तुळजापूर जि. उस्मानाबाद) हे गळाला लागले. झाडाझडती घेत कसून चाैकशी केली असता, गुन्ह्याची कबुली दिली.

गेला ५ लाखांचा; मिळाला २ लाखांचा माल...

घरफाेडीतील साेन्याचे दागिने आणि राेख ६० हजार असा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला आहे. घरफाेडीत जवळपास ४ लाख ८९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला हाेता. मात्र, दाेन लाखांचा मुद्देमाल पाेलिसांच्या हाती लागला आहे.

 

Web Title: House robbery worth 5 lakhs was solved in Latur, adamant criminal in the net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.