मालाडमध्ये एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला

By मनीषा म्हात्रे | Published: March 31, 2024 08:32 PM2024-03-31T20:32:36+5:302024-03-31T20:33:20+5:30

मुलगी जीव वाचविण्यासाठी धडपड करत होती. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हा हल्ला चढविला.

Fatal attack on teacher due to one-sided love in Malad | मालाडमध्ये एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला

मालाडमध्ये एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला

मुंबई : मालाडमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला चढविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

मालाड परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी २५ वर्षे चमन मो. हारुण इद्रिसी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, मंगळवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास तक्रारदार या कॉम्प्यूटर क्लासला शिकवण्यासाठी जात असताना इद्रिसीने तिला अडवले.

तिला "तुम मुझसे शादी करोगी या नहीं" अशी विचारणा करून तिला जीवेठार मारण्याची धमकी दिली. तिने नकार देताच जवळील लोखंडी रॉडने तिच्यावर हल्ला चढवला. इंदिरानगर परिसरात हा हल्ल्याचा थरार रंगला. मुलगी जीव वाचविण्यासाठी धडपड करत होती. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हा हल्ला चढविला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांच्या मदतीने तरुणीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तरुणीची प्रकृती गंभीर आहे. सायंकाळी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु आहे. 

Web Title: Fatal attack on teacher due to one-sided love in Malad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.