गोव्यात चोरटयांचा कहर! बाळ्ळीत साडेपाच लाखांचे दागिने लंपास; बेताळभाटीत मात्र चोरी अयशस्वी

By सूरज.नाईकपवार | Published: April 15, 2024 04:27 PM2024-04-15T16:27:25+5:302024-04-15T16:28:35+5:30

बेताळभाटी येथे रविवारी भर दिवसा एका बंद बंगल्यात दोघांजणांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला.

Chaos of robbers in Goa as Jewels worth five and a half lakhs were sold in Balli; But the theft failed in Betalbhati | गोव्यात चोरटयांचा कहर! बाळ्ळीत साडेपाच लाखांचे दागिने लंपास; बेताळभाटीत मात्र चोरी अयशस्वी

गोव्यात चोरटयांचा कहर! बाळ्ळीत साडेपाच लाखांचे दागिने लंपास; बेताळभाटीत मात्र चोरी अयशस्वी

सूरज नाईकपवार, लोकमत न्युज नेटवर्क, मडगाव: चोरटयांनी सदया गोव्यात कहर माजिवला असून, पट्टणबाळ्ळी येथे रविवारी रात्री अज्ञात चोरटयांनी एका घरात चोरी करताना अंदाजे साडेपाच लाख रुपये किंमतीचे सुवर्णलंकार चाेरुन नेले तर सासष्टीतील किनारपट्टी भागातील बेताळभाटी येथे चोरटयांनी एका बंगल्यात चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. बेताळभाटीची घटना सीसिटिव्ही कॅमेरावर बंदीस्त झाली असून, सदया या फुटेजवर कोलवा पोलिस पुढील तपास करीत आहेत तर बाळ्ळी येथे घडललेल्या चोरी प्रकरणात सदया कुंकळ्ळी पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान  चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

बाळ्ळी येथे जी चोरी झाली ते घर इनासियो फर्नांडीस यांचे आहे. चोरटे घराचे कौले काढून आत शिरले व नंतर त्यांनी सुवर्णलंकारवर डल्ला मारला. चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर फर्नांडिस यांनी यासंबधी कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात तक्रार नाेंदविली. पाेलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. चोरटयांचा माग काढण्यासाठी श्वान पथक तसेच ठसेतंज्ञानाही पाचारण करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ग्रासियश यांनी दिली.

दरम्यान, बेताळभाटी येथे रविवारी भर दिवसा एका बंद बंगल्यात दोघांजणांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. या बंगल्याचे मालक परदेशात असून, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसविले होते. हे कॅमेरा त्यांनी आपल्या मोबाईलला लिंक केले होते. दोघेजण आपल्या बंगल्यात हत्यार घेउन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्याला कळाल्यानतंर त्यांनी त्वरीत यासंबधी बंगल्यात जो केअरटेकर नियुक्त केला आहे त्याला कळीत केले. नंतर त्यांनी त्वरीत तेथे धाव घेतली घेउन आरडाओरडा केला असता, चोरटे घटनास्थळाहून पळून गेले. कोलवा पाेलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंद शिरोडकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Chaos of robbers in Goa as Jewels worth five and a half lakhs were sold in Balli; But the theft failed in Betalbhati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.