देहूरोड बाजारपेठेतून व्यापाऱ्याचे अपहरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 03:34 PM2018-12-24T15:34:30+5:302018-12-24T15:34:49+5:30

उधारीच्या व्यवहारातून अपहरण करण्यात आल्याची शक्यता आहे.

businessman kidnapping from Dehurod market | देहूरोड बाजारपेठेतून व्यापाऱ्याचे अपहरण 

देहूरोड बाजारपेठेतून व्यापाऱ्याचे अपहरण 

Next

देहूरोड : येथील बाजारपेठेतील एका प्रख्यात व्यापाऱ्याचे त्यांच्या राहत्या घराजवळून सकाळी सातच्या  सुमारास अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ईश्वर आगरवाल ( वय ५२ , रा मेन बाजार, देहूरोड, पुणे ) असे अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते सामाजिक कार्यकर्ते असून देहूरोड येथील श्री नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगरवाल हे त्यांच्या घराजवळ असलेल्या मंदिरात देवपूजेसाठी जात असताना सकाळी सातच्या सुमारास एका मोटारीतून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले आहे.उधारीच्या व्यवहारातून अपहरण करण्यात आल्याची शक्यता आहे. अपहरण करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असून त्यांच्या तपासासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांकडून दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त जी. एस माडगूळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहे.  

Web Title: businessman kidnapping from Dehurod market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.