Video : चित्तथरारक! आरपीएफ जवानामुळे वाचला धावती लोकल पकडणाऱ्या प्रवाशाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 21:00 IST2019-05-13T20:56:25+5:302019-05-13T21:00:52+5:30
धावत्या लोकलसह तो फरपटत गेला. मात्र, आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव बचावला.

Video : चित्तथरारक! आरपीएफ जवानामुळे वाचला धावती लोकल पकडणाऱ्या प्रवाशाचा जीव
मुंबई - जमील शेख नावाचा कापड व्यापारी आपला माल घेऊन कल्याणच्या दिशेने जात असताना ही थरारक घटना घडली. आज दुपारी १ वाजताच्या सुमारास ही जीवघेणी घटना घडली. कापड व्यापारी जमील शेख हा कापडाचं गाठोडं घेऊन धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढत होता. मात्र, धावत्या लोकलसह तो फरपटत गेला. मात्र, आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव बचावला. या घटनेची मात्र कुर्ला जीआरपीकडे नोंद नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आज दुपारी १ वाजताच्या सुमारास जमील याने आपले कपड्याचे गाठोडे लोकलमध्ये टाकले. नंतर धावती लोकल पकडत असताना जमील पाय निसटून तो प्लॅटफॉर्मवर फरपटत गेला. लोकलने वेग धरल्यानंतर तो रुळावर जाता - जाता वाचला. दरम्यान, प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवून लोकल तात्काळ थांबवून त्या व्यापाऱ्याचा जीव वाचविला.