ठळक मुद्देदिवसेंदिवस त्याचा उद्रेक वाढत होता. तो माझ्यावर अधिकार गाजवत होता.तिला बाहेरही पडता येत नव्हतं. पण बाहेर पडणं गरजेचं होतं. तरीही तिने हिंमत करुन खिडकीतून बाहेर उडी मारली.पण आता ती या सगळ्या प्रकरातून बाहेर आली आहे आणि सावरली आहे.

मिडलब्रॉ : प्रेमात पडल्यावर प्रेमींना फार असुरक्षित वाटु लागतं. आपल्या प्रियकरासोबत किंवा प्रेयसीसोबत इतर कोणी बोललं नाही पाहिजे, त्यांच्याकडे कोणी बघितलं नाही पाहिजे, असं वाटत राहतं. यातून अनेकदा वादही निर्माण होता. आणि हे वाद एवढ्या टोकाला जातात की त्यातून एकमेंकाचा जीवही घेतला जातो. असाच एक जीवघेणा प्रकार आहे लंडनच्या मिडलब्रॉ शहरात घडला आहे. आपल्या प्रेयसीला कोणी पाहू नये याकरता प्रियकराने चक्क प्रेयसीच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले, जेणेकरून ती विद्रूप दिसेल. 

मिरर युकेने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनच्या जेम्स कुक युनिव्हर्सिटीमध्ये काम करणारी ग्रेस हिच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. जवळपास वर्षभर तिने आपल्या प्रियकराचा अत्याचार सहन केला. मात्र जेव्हा हा अत्याचार सहन होण्यापलिकडे झाला तेव्हा तिने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. आता तिच्या प्रियकराला २० महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

ग्रेस विदरील ही एकोणीस वर्षाची मुलगी तिचा प्रियकर कॉसिस हॅरिसन याच्यासोबत राहत होती. हॅरिसन याने वर्षभर ग्रेसच्या जीवाला धोका पोहोचेल असेच कृत्य केले. गेल्यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी ग्रेसच्या एका मित्राने तिला ख्रिसमच्या शुभेच्छा एसएमएसद्वारे पाठवल्या. या गोष्टीचा हॅरिसन याला राग आला. त्यामुळेच त्याने तिच्यावर अत्याचार  करायला सुरुवात केली. आपल्या प्रेयसीसोबत इतर कोणी बोलू नये, तिला कोणी पाहू नये असं हॅरिसनला वाटायचं. याकरता तो ग्रेसचं मानसिक खच्चीकरणही करत असे. ग्रेस किती वाईट दिसते, ती कशी जाडी याबाबत तिला सारखं टोचून बोलत असे. सुरुवातीला ग्रेसने हा सगळा प्रकार दुर्लक्षित केला. मात्र नंतर हे सारं प्रकरण तिच्या सहन करण्याच्या पलीकडे गेलं आणि तिने पोलिसात तक्रार दाखल केली. 

ख्रिसमसच्या शुभेच्छांचा मॅसेज आल्यावर हॅरिसन हा ग्रेसवर तुटून पडला. त्याने तिला घराच्या वरच्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. तिच्या चेहऱ्यावर चाकूने वारही केले. त्यामुळे तिच्या नाकातून रक्तही वाहत होतं. बराच वेळ झाला तरीही रक्त थांबत नव्हतं, तेव्हा त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्यास सांगितले, मात्र या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली.

याबाबत ग्रेस म्हणाली की, ‘दिवसेंदिवस हॅरिसनचा उद्रेक वाढत होता. तो माझ्यावर अधिकार गाजवत होता. त्याच्या या रुपामुळे मी २४ तास भितीच्या सावटाखाली जगत होते. तो मला घरात कोंडून ठेवत असे. बंगल्याच्या गेटचा आवाज आला की माझ्या ह्रुदयात धडकीच भरायची, हा आल्यावर मला पुन्हा मारणार या भितीने मी झोपूही शकत नव्हते. एवढंच नाहीतर आमच्यात अनेक क्षुल्लक कारणांवरून वाद होत असत. तो माझी बॅग आणि मोबाईल स्वत:कडे घेऊन मला संपूर्णपणे नग्न करून एका खोलीत डांबून ठेवत असे. जेणेकरून मी बाहेर पडू शकणार नाही. त्यामुळे आमच्या प्रत्येक भांडणावेळी तो आता मला मारून टाकणार असंच वाटायचं.’

तिने याआधी तक्रार का केली नाही असं तिला पोलिसांनी विचारलं असता ती म्हणाली की, ‘पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तो आणखी चिघलळा असता, आणि पुन्हा कदाचित मला आणखी त्रास दिला असता. या भीतीने मी कोणालाच काहीच सांगितलं नाही.’ हॅरिसनने एकदा तिच्या अंगावर गरम पाणी ओतण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस ग्रेस पूर्णपणे नग्न होती. त्यामुळे या गरम पाण्याच्या माऱ्यापासून वाचण्याकरता तिला बाहेरही पडता येत नव्हतं. पण बाहेर पडणं गरजेचं होतं. तरीही तिने मनोधैर्य केलं आणि खिडकीतून बाहेर उडी मारली. बाहेर पडताच तिने तिच्या कारजवळ धाव घेतली. हा सगळा प्रकार तिला एका भयपटासारखाच वाटला असं ती म्हणते.

पण आता ती या सगळ्या प्रकरातून बाहेर आली आहे. एवढंच नाही तर अन्याय होत असलेल्या प्रत्येक स्त्रीला ती आत्मविश्वासाने आपल्या अन्यायाविरोधात आवाज उठवायला मदत करतेय. पुरुषांच्या या जाचातून बाहेर पडायला हवं यासाठी ती अनेकांना मार्गदर्शन करतेय. हॅरिसनला आता २० महिन्यांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे २० महिन्यानंतर ग्रेसला त्याच्याकडून पुन्हा त्रास होण्याची शक्यता आहे. पण ग्रेस आता पूर्णपणे आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे या सगळ्या गोष्टींचा सामना करायला तयार आहे. 

आणखी वाचा - ब्रेकअपनंतर त्यांच्या आठवणी विकण्यासाठी तरुणाने सुरु केला बाजार

आणखी वाचा - धक्कादायक ! ICU मध्ये तरुणीवर जबरदस्ती, ऑक्सिजन मास्क लावलं असतानाही करण्यात आले अत्याचार