भररस्त्यात गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 03:59 AM2018-07-14T03:59:58+5:302018-07-14T04:00:04+5:30

एमटीएनएल चौकातून तीनहातनाक्याकडे जाणाऱ्या भरगर्दीच्या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी एका तरुणाने ब्लेडने स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला.

attempt suicide news | भररस्त्यात गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न

भररस्त्यात गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न

Next

ठाणे - एमटीएनएल चौकातून तीनहातनाक्याकडे जाणाऱ्या भरगर्दीच्या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी एका तरुणाने ब्लेडने स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. शासकीय रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
तीनहातनाक्याकडे जाणाºया रस्त्यावरील आॅटोरिक्षाथांब्याच्या बाजूला असलेल्या दुकानांच्या समोर एका तरुणाने शुक्रवारी दुपारी अचानक ब्लेडने स्वत:चा गळा कापून घेतला. त्यामुळे हा तरुण दुकानांसमोरील फुटपाथवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला. नौपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमीला शासकीय रुग्णालयात भरती केले. पोलिसांनी त्याला नाव व पत्ता विचारला असता, त्याने नरेश असे असून नालासोपारा येथील राहणारा असल्याचे सांगितले. जखमीचे वय अंदाजे ३५ वर्षे असून, त्याच्याजवळ कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांना त्याची ओळख पटवता आली नाही. नौपाडा पोलिसांनी नालासोपारा पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्याची प्रकृती सुधारत आहे.

Web Title: attempt suicide news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा