Actor Guruprit Singh's mobile traced by police | अभिनेता गुरूप्रित सिंहचा मोबाइल पोलिसांनी काढला शोधून 
अभिनेता गुरूप्रित सिंहचा मोबाइल पोलिसांनी काढला शोधून 

ठळक मुद्देहिंदी मालिकांमधून गुरूप्रित हा अभिनेता झळकला. फेब्रुवारी महिन्यात गुरूप्रित हा त्याच्या मित्राच्या घरी होळीसाठी गेला होता. गुरूप्रितने जुहू पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली.

 

मुंबई -  जुहू परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध सिरियलमधील अभिनेता गुरप्रित सिंगचा मोबाईल होळीदरम्यान चोरीला गेला होता. याबाबत गुरूप्रितने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अखेर पोलिसांनी अथक प्रयत्नांनी गुरूप्रितचा मोबाइल शोधून काढत एका व्यक्तीला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतलं आहे.

हिंदी मालिकांमधून गुरूप्रित हा अभिनेता झळकला. फेब्रुवारी महिन्यात गुरूप्रित हा त्याच्या मित्राच्या घरी होळीसाठी गेला होता. त्यावेळी सर्व गोंधळात कुणीतरी गुरूप्रितचा मोबईल चोरला. या मोबाईलमध्ये गुरूप्रितचे अनेक महत्वाची कागदपत्रे आणि त्याचे पर्सनल फोटो होते. कित्येक तास शोधूनही मोबाइल मिळत नसल्यामुळे गुरूप्रितने जुहू पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुरूप्रितचा मोबाईल ट्रेसिंगला टाकला. त्यावेळी त्याचे लोकेशन उत्तर प्रदेशचे दर्शविले जात होतं. पोलिसांनी त्या लोकेशननुसार एकाला ताब्यात घेत त्याच्याजवळून गुरूप्रितचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी गुरूप्रितचा मोबाईल बुधवारी त्याच्याकडे सुपूर्द केला असून या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 


Web Title: Actor Guruprit Singh's mobile traced by police
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.