२५ वर्षांनी फरार आरोपी इस्राइलहून आला मुंबई; दुचाकीच्या नंबरवरून पुन्हा केली तुरुंगात रवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:16 PM2018-12-05T13:16:20+5:302018-12-05T13:18:36+5:30

पोलिसांना याची माहिती समजली. मात्र, पोलिसांकडे फक्त त्याच्या दुचाकीचा नंबर होता. या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले असून त्याची रवानगी तुरुंगात झाली आहे. ऑगस्टिन जोसेफ असे या आरोपीचे नाव आहे.

25 years after absconding accused from Mumbai; Rejoined by two-wheeler number again | २५ वर्षांनी फरार आरोपी इस्राइलहून आला मुंबई; दुचाकीच्या नंबरवरून पुन्हा केली तुरुंगात रवानगी 

२५ वर्षांनी फरार आरोपी इस्राइलहून आला मुंबई; दुचाकीच्या नंबरवरून पुन्हा केली तुरुंगात रवानगी 

Next
ठळक मुद्देऑगस्टिन जोसेफ (वय ५१) हा १९९२ मधील हत्या प्रकरणातील आरोपी आहे १९९२ मध्ये पैशांच्या वादातून ही हत्या झाली होतीसत्र न्यायालयानेही पोलिसांना जोसेफचा शोध घेण्याचे आदेश दिले होते

मुंबई - हत्येप्रकरणी जामीन मिळाल्यावर इस्राइलला पलायन केलेला आरोपी २५ वर्षांनी मुंबईत परतला. पोलिसांना याची माहिती समजली. मात्र, पोलिसांकडे फक्त त्याच्या दुचाकीचा नंबर होता. या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. ऑगस्टिन जोसेफ असं या आरोपीचं नाव आहे.

ऑगस्टिन जोसेफ (वय ५१) हा १९९२ मधील हत्या प्रकरणातील आरोपी आहे. जोसेफ आणि त्याच्या पाच मित्रांनी शिवडीमधील अंजूमन इस्लाम या तरुणाची हत्या केली होती. १९९२ मध्ये पैशांच्या वादातून ही हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. १९९३ साली जोसेफला या प्रकरणात जामीन मिळाला. १९९४ मध्ये जोसेफ इस्राइलला फरार झाला. जोसेफ आणि त्याची पत्नी इस्राइलला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तो अधूनमधून भारतात येत असल्याचेही पोलिसांना समजले होते. मात्र, तो पोलिसांच्या जाळ्यात सापडत नव्हता.

सत्र न्यायालयानेही पोलिसांना जोसेफचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा कक्ष क्रमांक ९ चे पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाला जोसेफ डिसेंबर २०१७ मध्येच भारतात परतल्याची माहिती मिळाली होती. तो मुंबईतील वांद्रे येथील नवीन घरात राहत असल्याचे पोलिसांना समजले होते. त्याच्याकडे दुचाकी असल्याचेही समोर आले होते. पोलिसांनी याच दुचाकीच्या आधारे आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक हरीश बनसोडे आणि पोलीस हवालदार प्रकाश वारंग यांना जोसेफची दुचाकी वांद्रे पश्चिम परिसरात दिसल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस पथकाने जोसेफला अटक केली. चौकशीदरम्यान जोसेफनेही गुन्ह्याची कबुली दिली असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: 25 years after absconding accused from Mumbai; Rejoined by two-wheeler number again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.