...तर मनपा कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील; खंडपीठाची सक्त नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 07:08 PM2018-09-11T19:08:08+5:302018-09-11T19:08:47+5:30

कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही तर महापालिका कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील, अशा शब्दात खंडपीठाने महापालिकेची कानउघाडणी केली.

... will celebrate the 'anniversary' of the municipal waste; Justice Benazir Bhutto | ...तर मनपा कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील; खंडपीठाची सक्त नाराजी

...तर मनपा कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील; खंडपीठाची सक्त नाराजी

googlenewsNext

औरंगाबाद : कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही तर महापालिका कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील, अशा शब्दात खंडपीठाने महापालिकेची कानउघाडणी केली. गेल्या सहा महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे डोंगर साचले असून, सर्वत्र मोठ्या प्रमाणात वायू आणि जलप्रदूषण वाढत असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी सोमवारी न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली, त्यावर अशी नाराजी खंडपीठाने नोंदविली.

त्यासोबत ‘लोकमत’ने जालना रोडवरील दोन पंचतारांकित हॉटेलसमोर कचऱ्याचा ढीग टाकून महापालिकेने विदेशी पर्यटकांसमोर ओंगळवाणे प्रदर्शन मांडल्याबाबत प्रकाशित केलेल्या छायाचित्रांवरूनही खंडपीठाने सक्त नाराजी व्यक्त केली. जगभरातून आलेले बहुतांश पर्यटक याच हॉटेलमध्ये थांबतात. या पर्यटकांच्या शहरातील निवासाच्या ठिकाणापासून मकबरा व इतर प्रेक्षणीय स्थळांपर्यंत कचऱ्याचे असेच ढीग साचलेले त्यांना दिसतात, ही बाब निश्चितच खेदजनक असल्याचे खंडपीठाने म्हटले. इतकेच नव्हे तर न्यायमूर्तीद्वयांनी शहरातील अनेक भागांत फेरफटका मारला असता त्यांनाही ठिकठिकाणी असेच कचऱ्याचे ढीग आढळल्याचे सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले. 

कित्येक महिन्यांपासून साचलेल्या कचऱ्यामुळे उद्भवणाऱ्या सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या समस्यांचा विचार महापालिकेने करणे जरूरी आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास नागरिकांना ‘आॅक्सिजन’ मिळविणे दुरापास्त होईल. भारतीय लोक उत्सवप्रिय आहेत.  कचऱ्यापासून खत, इंधन आदी निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही खंडपीठाने सुचविले. सुनावणीदरम्यान अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, हर्सूल परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, सुमारे २५० ते ३०० झाडे तोडण्यात आली आहेत. या परिसरातून गेलेली ऐतिहासिक नहर-ए-अंबरी फोडल्यामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले आहे. जवळपास दोन कि.मी. परिसरातील विहिरींमधील पाणी काळे झाले आहे. 

वैद्यकीय परीक्षणात हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे समजल्याचे त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. महापालिकासुद्धा कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या लवकरच दूर करण्यात येतील, असे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी खंडपीठास सांगितले.

Web Title: ... will celebrate the 'anniversary' of the municipal waste; Justice Benazir Bhutto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.