वडवणी तालुका दोन दिवसांपासून अंधारात

By Admin | Published: June 11, 2014 12:19 AM2014-06-11T00:19:21+5:302014-06-11T00:25:52+5:30

वडवणी: शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यात पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Wadwani taluka will be in dark in two days | वडवणी तालुका दोन दिवसांपासून अंधारात

वडवणी तालुका दोन दिवसांपासून अंधारात

googlenewsNext

वडवणी: शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यात पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळातच वडवणी तालुक्याला वीजपुरवठा करणारे मुख्य खांब पडल्याने महावितरणच्या गलथान कारभारामुळे तब्बल दोन दिवस संपूर्ण वडवणी तालुका अंधारात होता. मंगळवारी दुपारपर्यंतही याचे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सर्वत्र गारांचा मारा झाला. तर मागील आठवड्यापासून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. या पावसामध्ये लिंबोणी, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, उन्हाळी बाजरी, मका या पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातून शेतकरी अद्यापही सावरलेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर अगोदरच आभाळाएवढे दु:ख कोसळले असताना वडवणी तालुक्यात महावितरणचा गलथान कारभार मागील दोन महिन्यांपासून सुरुच आहे. शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यात महावितरणच्या वीजपुरवठा करणारे मुख्य खांब पडल्याने शुक्रवारी चार वाजल्यापासून तालुक्यातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे वडवणी तालुक्यातील ग्रामस्थ हैराण झाले असून, विजेअभावी अनेक कामे खोळंबली आहेत.
तालुक्यात एक सबस्टेशन असून, या सबस्टेशनवर एकूण ३६ गावांचा समावेश आहे. तालुक्यातील मोरवडजवळील दत्त मंदिराजवळ वीजपुरवठा करणारा मुख्य खांब या वादळी वाऱ्यात पडला. तब्बल २० तास उलटूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आलेले नाही. यावरुन वडवणी तालुक्यात महावितरणचा गलथान कारभार कशाप्रकारे चालतो? हे स्पष्ट दिसून येते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांमधून केला जात आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत वडवणीचे शाखा अभियंता आशिष धारणे म्हणाले, आमचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी गेले आहेत. लवकरच वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल. (वार्ताहर)
तब्बल २० तास उलटूनही महावितरणला वीजपुरवठा सुरळीत करण्यात अपयश
वीज पुरवठा करणारा मुख्य खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित
तालुक्यातील ३६ गावे शुक्रवारी चार वाजेपासून अंधारातच
महावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर
वादळी वाऱ्याचा संपूर्ण वडवणी तालुक्याला फटका

Web Title: Wadwani taluka will be in dark in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.