फोक्सवॅगनचे इंजिन तयार होणार औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:09 AM2017-12-08T01:09:06+5:302017-12-08T01:09:16+5:30

शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या स्कोडा आॅटो इंडिया लि. या कंपनीत फोक्सवॅगनचे इंजिन तयार करण्यासाठी नव्याने इंजिन असेंब्ली लाइन तयार करण्यात येणार असल्याचे वृत्त उद्योग वर्तुळात चर्चेला आले आहे.

 Volkswagen engine to be ready in Aurangabad | फोक्सवॅगनचे इंजिन तयार होणार औरंगाबादेत

फोक्सवॅगनचे इंजिन तयार होणार औरंगाबादेत

googlenewsNext
ठळक मुद्देशेंद्र्यातील स्कोडा कंपनीच्या प्रकल्पामध्ये होणार नवीन असेंब्ली

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या स्कोडा आॅटो इंडिया लि. या कंपनीत फोक्सवॅगनचे इंजिन तयार करण्यासाठी नव्याने इंजिन असेंब्ली लाइन तयार करण्यात येणार असल्याचे वृत्त उद्योग वर्तुळात चर्चेला आले आहे.

यासंबंधी लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून, ३ लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन औरंगाबादेत तयार करून घेण्याचा फोक्सवॅगन व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे. २ लिटर डिझेल इंजिन चाकण येथील औद्योगिक वसाहतीमधील कंपनीच्या प्रकल्पात तयार केले जाईल. लोकलवर इंजिन उत्पादन करून तेथेच कार बाजारपेठेत आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्झरी कारचे उत्पादन करणा-या कंपन्यांनी भारतीय आॅटोमोबाइल बाजारपेठेत गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. लोकल पातळीवर उत्पादनामुळे विपणन व वितरण करणे लवकर शक्य होणार असल्यामुळे विदेशी कार उत्पादक कंपन्या असेंब्ली लाइन विकसित करण्यासाठी महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचा शोध घेत असल्याचे कळते.

आॅडी आणि बीएमडब्ल्यू या दोन्ही गु्रपने जोरदार आगमन केल्यानंतर तेदेखील दुसºया टप्प्यात गुंतवणुकीबाबत विचार करीत आहेत. व्हाल्वो आॅटो इंडिया या कंपनीने बंगळुरू येथील स्थानिक पातळीवर सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. तसेच मर्सिडीज बेंज आणि जेएलआरदेखील नवीन मॉडेल निर्मितीसाठी असेंब्लीची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होते काय, याचा शोध घेत आहे. पाच वर्षांत आॅटोमोबाइल्सची बाजारपेठ दोनअंकी टक्केवारी गाठण्यात यशस्वी राहिली आहे.
२०१५ च्या तुलनेत २०१७ मध्ये जास्तीची उलाढाल कार विक्रीतून होण्याची शक्यता आहे.

अद्याप तारीख ठरली नाही
शेंद्र्यातील स्कोडा आॅटो इंडिया लि. या कंपनीत फोक्सवॅगन या कंपनीची असेंब्ली सुरू करण्याबाबत तारीख ठरलेली नाही; परंतु नवीन वर्षाच्या मध्यापर्यंत फोक्सवॅगनचे इंजिन औरंगाबादेत तयार होण्याची शक्यता आहे.
स्कोडा कंपनीनेदेखील वाळूज येथे असेंब्ली लाइन तयार केल्यानंतर बºयाच वर्षांनी शेंद्र्यात उद्योग उभारणी केली होती. त्यामुळे फोक्सवॅगनला दक्षिण भारतातील बाजारपेठेत व्यवसायाचा स्कोप मिळाला, तर भविष्यात या उद्योगाचा विस्तार होऊ शकतो.

Web Title:  Volkswagen engine to be ready in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.