घाटी रुग्णालयात औषधी टंचाई कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:51 AM2018-09-04T00:51:09+5:302018-09-04T00:51:34+5:30

घाटी रुग्णालयासह राज्यभरात १ सप्टेंबरपर्यंत १४३ आजारांसाठीच्या औषधींचा साठा दाखल होईल, असा दावा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी केला होता; परंतु घाटीत हा साठा अद्याप आलेला नाही.

 The Valley Hospital maintains a drug shortage | घाटी रुग्णालयात औषधी टंचाई कायम

घाटी रुग्णालयात औषधी टंचाई कायम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयासह राज्यभरात १ सप्टेंबरपर्यंत १४३ आजारांसाठीच्या औषधींचा साठा दाखल होईल, असा दावा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी केला होता; परंतु घाटीत हा साठा अद्याप आलेला नाही. त्यामुळे रुग्णालयातील औषध टंंचाई कायम असल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल सुरूच आहेत.
न्यायालयीन प्रकरणानिमित्त डॉ. शिनगारे शहरात आले असताना त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला होता. त्यावेळी १ सप्टेंबरपर्यंत औषधींचा पुरवठा होणार असल्याचे ते म्हणाले होते. घाटी रुग्णालयात सोमवारी माहिती घेतली असता अद्याप औषधी प्राप्त झालेली नसल्याची माहिती समोर आली. घाटीत दररोज मराठवाड्यासह विदर्भ आणि लगतच्या भागातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात.
यामध्ये एकट्या बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागात दररोज १,७०० ते २,००० रुग्णांवर उपचार होतात. यातील अनेकांना आंतररुग्ण विभागात दाखल केले जाते. घाटीत गेल्या वर्षभरापासून औषधांची टंचाई आहे.
प्रतिजैविके, अ‍ॅन्टिरेबीज व्हॅक्सिन, मेट फारमिन, आयसो सरबाईट, अशा मधुमेह, उच्च रक्तदाबासह महत्त्वाच्या औषधींच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यातही गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून औषधींची खरेदी करावी लागत आहे.
औषधी खरेदी घोटाळ्यांना पायबंद घालण्यासोबतच तिच्या खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्याची जबाबदारी ‘हाफकिन’ कंपनीवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ‘हाफकिन’कडूनच औषधी खरेदी होणार आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून घाटी रुग्णालयास औषधी उपलब्ध होण्याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण असा दोन्ही विभागांची एकत्र औषधी खरेदी ‘हाफकिन’ला अवघड होते. त्यामुळे त्यांनी दर तीन महिन्यांचा एक अशा चार टप्प्यांत याद्या,अशी सूचना केली. त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात आणखी उशीर झाला. या सगळ्या प्रक्रियांच्या गोंधळात घाटी रुग्णालयात औषधींची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्याचा भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे.

Web Title:  The Valley Hospital maintains a drug shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.