कन्नडमध्ये शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता

By Admin | Published: July 29, 2014 12:57 AM2014-07-29T00:57:01+5:302014-07-29T01:14:28+5:30

औरंगाबाद : कन्नडच्या आमदारावरून शिवसेनेत सुरू झालेल्या सुंदोपसुंदीमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांची अवस्था संभ्रमित झाली आहे.

Uncertainty in Shivsena's cot in Kannada | कन्नडमध्ये शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता

कन्नडमध्ये शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता

googlenewsNext

औरंगाबाद : कन्नडच्या आमदारावरून शिवसेनेत सुरू झालेल्या सुंदोपसुंदीमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांची अवस्था संभ्रमित झाली आहे. आमदाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या इतर २४ पदाधिकाऱ्यांपैकी आणखी काही जणांविरुद्ध कारवाईची कुऱ्हाड चालणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदाराविरुद्ध तक्रार केली म्हणून कन्नडचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांना तडकाफडकी पदमुक्त करण्यात आल्यामुळे तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे.
यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी लोकमत कार्यालयास दूरध्वनी करून संतप्त भावना व्यक्त केल्या.
घोसाळकरांना पूर्वकल्पना
आमदाराने स्थानिक पदाधिकाऱ्याला दिलेल्या धमकीची तक्रार कन्नडच्या त्या २५ पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यापूर्वी मराठवाड्याचे संपर्कप्रमुख आ. विनोद घोसाळकर यांच्याकडेही केली होती. ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आलेले निवेदन घोसाळकरांनाही देण्यात आले होते.
घोसाळकरांच्या उपस्थितीत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्याची चौकशी करण्याचे ठरले होते, असे बैठकीला उपस्थित सूत्रांनी सांगितले.
निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या प्रमुखांपैकी कन्नडचे तालुकाप्रमुख डॉ.अण्णा शिंदे यांना संपर्क साधला असता, आमचे म्हणणे आम्ही पक्षाकडे मांडले आहे, असे सांगून त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
कारवाईची टांगती तलवार
निवेदनावर स्वाक्षरी करणारे कन्नड तालुक्यातील २५ प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यातील अन्य काही प्रमुख पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने चालविला आहे. परंतु राठोडविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईचा रोष शिवसेनेचे कार्यकर्ते व नागरिकांतून व्यक्त होत असल्यामुळे सध्या सदर कारवाई रोखण्यात आली आहे.
असे असले तरी हा रोष कमी होताच पुन्हा कारवाईची कुऱ्हाड चालविली जाण्याची भीती या पदाधिकाऱ्यांतून व्यक्त होते आहे.
४परंतु याविषयी कुणीही समोर येऊन बोलण्यास तयार नाहीत. या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला असता बहुतांश जणांनी आपण मुंबईत असल्याचे सांगून फोन स्वीच आॅफ केले.

Web Title: Uncertainty in Shivsena's cot in Kannada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.