औरंगाबादेत ६० लाख किमतीचे दोन मांडूळ केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:13 AM2018-02-18T00:13:25+5:302018-02-18T00:13:31+5:30

गुप्तधनासाठी मांत्रिकांकडून काळ्या बाजारात सोन्याचा भाव असलेले दोन मांडूळ गुन्हे शाखा पोलिसांनी वाळूज एमआयडीसी परिसरातील पंढरपूर येथे एका खोलीत छापा मारून जप्त केले. याप्रकरणी दोन तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Two Mangulas worth Rs 60 lakh were seized in Aurangabad | औरंगाबादेत ६० लाख किमतीचे दोन मांडूळ केले जप्त

औरंगाबादेत ६० लाख किमतीचे दोन मांडूळ केले जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देछापा : वाळूज एमआयडीसी परिसरात रात्री कारवाई; दोन तस्कर अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गुप्तधनासाठी मांत्रिकांकडून काळ्या बाजारात सोन्याचा भाव असलेले दोन मांडूळ गुन्हे शाखा पोलिसांनी वाळूज एमआयडीसी परिसरातील पंढरपूर येथे एका खोलीत छापा मारून जप्त केले. याप्रकरणी दोन तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दीपक सोमीनाथ मोरे (४०,रा. वडगाव) आणि सुनील वाडीलाल चव्हाण (२८,रा. वडगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे म्हणाले की, जादूटोणा करून गुप्तधन शोधण्यासाठी मांत्रिक मंडळी मांडुळाचा वापर करतात, अशा मांत्रिकांकडून मांडुळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
मांडुळाच्या वजनानुसार मांडुळाचा दर काळ्या बाजारात ठरतो. यामुळे काही लोक मांडुळाची विक्री करीत असतात. वाळूज एमआयडीसी परिसरातील पंढरपूर येथील एका वीटभट्टीजवळ राहणाºया दोन जणांकडे मांडूळ असून ते दोन्ही मांडूळ विक्रीसाठी मुंबईला घेऊन जाणार असल्याची माहिती खबºयाने गुन्हेशाखा पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सुधाकर राठोड, नवाब शेख, योगेश गुप्ता, लालखॉ पठाण, नंदलाल चव्हाण, सिद्धार्थ थोरात, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे यांनी १६ फेबु्रवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास संशयितांच्या घरांवर छापे मारले. यावेळी दीपकच्या खोलीत चॉकलेटी रंगाचे ३ फूट लांबीचे आणि ४ किलो वजनाचे मांडूळ मिळाले, तर आरोपी सुनीलच्या खोलीत दीड फूट लांबीचे आणि एक किलो वजनाचे चॉकलेटी रंगाचे दुसरे मांडूळ मिळाले. या दोन्ही मांडुळांची काळ्याबाजारातील किंमत अनुक्रमे ४० लाख आणि २० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
५५ लाखांत विक्री करणार होते
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी जंगलात खोदकाम करीत असताना हे दोन्ही मांडूळ सापडले होते. मांडुळांना गुप्तधन काढणारे लोक मागेल त्या किमतीत खरेदी करतात ही बाब त्यांना समजली होती. यामुळे त्यांनी या मांडुळांची किंमत ५५ लाख रुपये ठरविली होती. ते मुंबईला जाऊन मांडूळ विक्री करणार होते.
वन विभागाकडे सुपूर्द
काळ्या बाजारात विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी दोन्ही मांडूळ जप्त केल्यानंतर या कारवाईची माहिती वन विभागास देण्यात आली. १७ रोजी सकाळी वन विभागाचे अधिकारी एस. वाय. गवंडर, वनपाल पाटील, गार्ड एम. पी. कांबळे यांच्या ताब्यात दिले.

Web Title: Two Mangulas worth Rs 60 lakh were seized in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.