बिबट्याची तीन पिले आढळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:23 AM2017-12-13T01:23:07+5:302017-12-13T01:23:17+5:30

कन्नड तालुक्यातील आलापूर शिवारात बिबट्याची तीन नवजात पिले आढळल्याने ग्रामस्थ व शेतकºयांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. शिवना -टाकळी मध्यम प्रकल्पाच्या जवळच पुनर्वसित आलापूर शिवारात गुलाबराव विश्वनाथ कोरडे यांच्या गट क्र.४२ मधील शेतात उसतोड सुरु आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ऊसतोड कामगारांना उसाच्या फडात बिबट्याची तीन पिले आढळली.

 Three piglets of leopard were found | बिबट्याची तीन पिले आढळली

बिबट्याची तीन पिले आढळली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हतनूर : कन्नड तालुक्यातील आलापूर शिवारात बिबट्याची तीन नवजात पिले आढळल्याने ग्रामस्थ व शेतकºयांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.
शिवना -टाकळी मध्यम प्रकल्पाच्या जवळच पुनर्वसित आलापूर शिवारात गुलाबराव विश्वनाथ कोरडे यांच्या गट क्र.४२ मधील शेतात उसतोड सुरु आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ऊसतोड कामगारांना उसाच्या फडात बिबट्याची तीन पिले आढळली.
त्यांना बघताच त्यांच्या पाचावर धारण बसली. या कामगारांनी आरडाओरड केल्यानंतर जवळपास ५० शेतकरी जमा झाले. अर्धा तास त्या पिलांना शेतकरी व कामगारांनी पकडून ठेवले. परंतु पिले पाहून बिबट्या हल्ला करेल, या भितीने त्यांनी ही पिले ऊसाच्या फडात सोडून दिले.
वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल राहणे, वनपाल एल.व्ही.घुगे, आर. व्ही. शिंदे, वनरक्षक एम. आर. गुरसाळे, एन.के. घोडके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या वन कर्मचारी परिसरातच ठाण मांडून असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल राहणे यांनी सांगितले.
वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावावा व त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोपट राजपूत, संजय भेंडाळे, साहेबराव शिरसाठ, बाबासाहेब पवार आदींसह ग्रामस्थानी केली आहे.
दोन वर्षांपासून जैतापूर, आलापूर, हतनूर, केसापूर, टापरगाव शिवारात बिबट्याचे दर्शन होत आहे. या संपूर्ण परिसरात उसाचे घनदाट क्षेत्र असल्याने बिबट्याने अजून तरी स्थलांतर न केल्याने शेतकºयात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबटे हे नर मादी तर आहेतच. मात्र तिन्ही पिले आढळल्याने शाळकरी मुलांसह शेतकरी, महिला, मजूरही घाबरलेले आहेत.

Web Title:  Three piglets of leopard were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.