जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या

By Admin | Published: February 5, 2017 11:30 PM2017-02-05T23:30:28+5:302017-02-05T23:32:20+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत आहेत़

The thieves in the district increased | जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या

जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत असून, परवाच उमरग्यात चोरट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. शनिवारी परंडा तालुक्यातील साकत शिवारातून एक विद्युत मोटार तर त्यापूर्वी भूम शहरातून चोरट्यांनी दुचाकी पळवून नेल्याची घटना घडली आहे.
परंडा तालुक्यातील साकत येथील वसंत दिगांबर हुके यांचे गावच्या शिवारात शेत आहे़ हुके यांच्या शेतातील विहिरीतून तीन एचपीची इलेक्ट्रीक मोटार शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केली़ या घटनेत हुके यांचे जवळपास पाच हजार रूपयांचे नुकसान झाले़ याबाबत हुके यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि सूर्यवंशी हे करीत आहेत़
चोरट्यांनी पळविली दुचाकी
भूम : शहरातील समर्थनगर भागातील एक दुचाकी चोरट्यांनी लंपास केली़ ही घटना २३ जानेवारी रोजी घडली असून, या प्रकरणी ५ फेब्रुवारी रोजी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूम शहरातील समर्थनगर भागात राहणारे विष्णूदास तांबे यांनी त्यांची दुचाकी (क्ऱएम़एच़२५- व्ही़ ३४१८) २३ जानेवारी रोजी रात्री घरासमोर लावली होती़ ही दुचाकी चोरट्यांनी लंपास केली़ शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने विष्णूदास तांबे यांनी भूम ठाण्यात चोरट्यांविरूध्द तक्रार दिली़ या तक्रारीवरून भूम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: The thieves in the district increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.