चोरटे बनले हायटेक; पोलिसांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:25 AM2017-12-10T00:25:15+5:302017-12-10T00:25:21+5:30

एखाद्या घरी चोरी, घरफोडी झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. गुन्हा करण्याची पद्धत, चोरट्यांच्या हाताच्या बोटाचे ठसे, या आधारे चोरी कोणत्या चोरट्यांनी केली असेल, याचा अंदाज बांधतात आणि चोरापर्यंत पोहोचतात. आता मात्र चोरटे वेगवेगळ्या पद्धतीने चो-या करतात आणि पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी हायटेक उपकरणांचा वापर करतात. हायटेक झालेल्या चोरट्यांमुळे पोलिसांना प्रसारमाध्यमे आणि वरिष्ठांच्या टीकेचे धनी व्हावे लागते.

 Thieves became hitech; Challenge before the police | चोरटे बनले हायटेक; पोलिसांसमोर आव्हान

चोरटे बनले हायटेक; पोलिसांसमोर आव्हान

googlenewsNext

बापू सोळुंके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एखाद्या घरी चोरी, घरफोडी झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. गुन्हा करण्याची पद्धत, चोरट्यांच्या हाताच्या बोटाचे ठसे, या आधारे चोरी कोणत्या चोरट्यांनी केली असेल, याचा अंदाज बांधतात आणि चोरापर्यंत पोहोचतात. आता मात्र चोरटे वेगवेगळ्या पद्धतीने चो-या करतात आणि पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी हायटेक उपकरणांचा वापर करतात. हायटेक झालेल्या चोरट्यांमुळे पोलिसांना प्रसारमाध्यमे आणि वरिष्ठांच्या टीकेचे धनी व्हावे लागते.
गुन्हे शाखेने नुक तीच खिडकी गँग पकडली. तेव्हा या गँगने शहरातील अनेक बंगले आणि घरे फोडून धुमाकूळ घातल्याचे चौकशीत समोर आले. बीड, अहमदनगर येथून ही गँग कारने शहरात यायची आणि घरफोड्या करून सहीसलामत परत जायची. पोलीस मात्र त्यांच्या रेकॉर्डवरील दुसºयाच चोरट्यांना पकडून त्यांच्याकडे विचारपूस करीत. चोरट्यांची ही टोळी गुन्हा करताना हायटेक उपकरणाचा वापर करी. परिणामी ते पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी होत. त्यांच्याकडे आढळलेली मायक्रो बॅटरी पाहून पोलिसांना धक्काच बसला. दोन बोटांच्या चिमटीत पकडून ठेवता येईल अशी ही बॅटरी.
या बॅटरीचा कुलूप उघडण्यासाठी अथवा खिडकीचे स्क्रू काढण्यासाठी ते वापर करीत. अंधारात या बॅटरीचा प्रकाश काजव्यासारखा भासतो. यामुळे ती बॅटरी असावी, असा कोणाला संशयही येत नाही. त्यांनी वापरलेला स्क्रू ड्रायव्हर, चिमटा, छोटी टॉमी आणि हॅण्डग्लोज असे साहित्य खिशात बसतील असे होते. बोटांचे ठसे पोलिसांना घटनास्थळी मिळू नयेत, यासाठी चोरटे हॅण्डग्लोज वापरतात.
एवढेच नव्हे तर मोबाईल लोकेशनवरून पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, यामुळे आता अनेक चोरट्यांनी मोबाइल वापरणेही बंद केले. औरंगाबादसारख्या शहरात सीसीटीव्हीत कैद होण्याच्या भीतीपोटी चोरटे चेहºयाला मास्क लावतात. पकडल्या जाऊ नये म्हणून चोरटे रिक्षाचा वापर करतात.
पोलीस यंत्रणाही थक्क
चोरट्यांप्रमाणे सरकारी नोकरींची परीक्षा देताना गुन्हेगार आता हायटेक उपकरणांचा वापर करताना दिसतात. मानवी त्वचेच्या रंगाचे मायक्रो ब्लू टूथ आॅनलाइन बाजारात सहज मिळते. गत महिन्यात मुकुंदवाडी पोलिसांनी पकडलेल्या हायटेक कॉपी प्रकरणातील आरोपींनी प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी आणि उत्तरे पाठविण्यासाठी वापरलेले मायक्रो मोबाइल फोन आणि ब्लू टूथ पाहून पोलीस यंत्रणा थक्क झाली. यासोबत सायबर गुन्हेगारही सामान्यांना फसविण्यासाठी नवीन नवीन फंडे वापरत असतात. बँक अधिकारी बोलत असल्याची थाप मारून सायबर गुन्हेगार सामान्यांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपये पळवितात. क ाही प्रकरणात लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून गुन्हेगार त्यांच्या बँक खात्यात रकमा भरण्यास सांगून फसवितात.

Web Title:  Thieves became hitech; Challenge before the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.