सिल्लोड येथून ट्रकची चोरी; सहा महिन्यांनी आरोपी बुलढाणा तुरुंगात तर ट्रक सापडला तेलंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 07:01 PM2024-03-23T19:01:27+5:302024-03-23T19:02:18+5:30

सहा महिन्यांनी आरोपी बुलढाणा तुरुंगातून ताब्यात

The theft of a truck from Sillod; Six months later, the accused was found in Buldhana jail and the truck was found in Telangana | सिल्लोड येथून ट्रकची चोरी; सहा महिन्यांनी आरोपी बुलढाणा तुरुंगात तर ट्रक सापडला तेलंगणात

सिल्लोड येथून ट्रकची चोरी; सहा महिन्यांनी आरोपी बुलढाणा तुरुंगात तर ट्रक सापडला तेलंगणात

सिल्लोड: तालुक्यातील शिवना येथून ट्रक चोरून फरार झालेल्या एका आरोपीला अजिंठा पोलिसांनी बुलढाणा येथील तुरुंगातून शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले. राहुल गोटिराम साबळे (२८, रा.कुऱ्हा गोतमारा ता.मोताळा जि.बुलढाणा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. 

सहा महिन्या पूर्वी सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील कृषी व्यापारी अंकूश दांडगे यांच्या मालकीचा ट्रक (एमएच ४८ एवाय २६६३ )  हा सप्टेंबर २०२३ मध्ये साईश्रध्दा कृषी सेवाकेंद्रा समोरून चोरीस गेला होता. याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध त्यावेळी गुन्हा दाखल केला होता. 

दरम्यान, तपासानंतर पोलिसांना ही चोरी राहुल साबळे यांनी केली असावी असा  संशय होता.  मात्र तो सापडत नव्हता. याचवेळी साबळेला बुलढाणा पोलिसांनी एका प्रकरणात अटक केली होती. अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे, बिटजमादार अरुण गाडेकर यांनी न्यायालयाच्या परवानगीने साबळेला बुलढाणा तुरुंगातून ताब्यात घेतले. आज दुपारी न्यायालयाने त्याला एक दिवसीय पोलिस कोठडी सुनावली. 

चोरलेला ट्रक तेलंगाणात... 
दरम्यान, कोठडीत साबळेने शिवना येथून ट्रक चोरून बुलढाणा, उंद्री, बाळापूर, वाशिम, पुसद, आदिलाबादमार्गे तेलंगणात नेल्याची कबुली दिली. अजिंठा पोलिसांच्या माहितीवरून तेलंगाणा पोलिसांनी वरंगल जिल्ह्यातील तिलकानुर्ती येथून चोरीचा ट्रक ताब्यात घेतल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी दिली.

Web Title: The theft of a truck from Sillod; Six months later, the accused was found in Buldhana jail and the truck was found in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.