गर्लफ्रेंडचे लग्न ठरलं, तरुणाने नवरदेवास इन्स्टाग्रामवर पाठवला दोघांचा अश्लील व्हिडिओ

By बापू सोळुंके | Published: March 25, 2023 04:33 PM2023-03-25T16:33:22+5:302023-03-25T16:37:40+5:30

अल्पवयीन तरुणी आणि आरोपी यांच्यात वर्षभर प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणामुळे त्यांच्यात ब्रेकअप झाला.

The girlfriend's marriage was fixed, the young man sent an obscene video of both of them to the groom's instagram | गर्लफ्रेंडचे लग्न ठरलं, तरुणाने नवरदेवास इन्स्टाग्रामवर पाठवला दोघांचा अश्लील व्हिडिओ

गर्लफ्रेंडचे लग्न ठरलं, तरुणाने नवरदेवास इन्स्टाग्रामवर पाठवला दोघांचा अश्लील व्हिडिओ

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: वर्षभरापासून प्रेमात असलेली तरुणी दुसऱ्या मुलासोबत लग्न करणार असल्याचे कळताच तरुणाने तिच्यासोबत एकांतात मोबाइलवर बनविलेला व्हिडिओ आणि काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर तरुणीच्या आत्याच्या मुलाला फोन करुन त्याने शिवीगाळ केल्याचा  प्रकार १ ते २४ मार्चदरम्यान शहरात घडला. याविषयी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अरबाज खान (२०,रा.नारेगाव)असे आरोपीचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार, अल्पवयीन तरुणी आणि आरोपी यांच्यात वर्षभर प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणामुळे त्यांच्यात ब्रेकअप झाला. यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी तिचा विवाह तिच्या आत्याच्या मुलासोबत करण्यासाठी बोलणी सुरू केली. ही बाब अरबाज खानला समजातच त्याने तिचे लग्न मोडण्यासाठी तिला धमकावणे सुरू केले. मात्र ती ऐकत नसल्याचे पाहुन त्यांनी एकातांत काढलेले छायाचित्रे आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर  आणि तिच्या भावी नवरदेवाला पाठविण्याची धमकी दिली. तुझे दुसरे कोणासोबत लग्न हाऊ देणार नाही, असेही तो तिला म्हणाला.   

त्यानुसार आत्याच्या मुलाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी सोबत काढलेले छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर  केला. यासोबतच तिच्या आत्याच्या मुलाला शिवीगाळ केली. १ ते २४ मार्च दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे व्यथित झालेेल्या तरुणीने शेवटी अरबाजविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा आबूज तपास करीत आहेत.

Web Title: The girlfriend's marriage was fixed, the young man sent an obscene video of both of them to the groom's instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.