'मी नाराज असल्याच्या चर्चा...', शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 09:43 AM2024-03-16T09:43:54+5:302024-03-16T09:49:52+5:30

Ambadas Danve Latest News:ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Talks about me being upset are pointless says Ambadas Danve | 'मी नाराज असल्याच्या चर्चा...', शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया

'मी नाराज असल्याच्या चर्चा...', शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन दिवसात ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरुन ते नाराज झाल्याचे बोलले जात आहे, आता यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी नाराज असल्याच्या चर्चांना काही अर्थ नाही,  मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणारा शिवसैनिक आहे, असंही दानवे यांनी सांगितले आहे. 

"मी नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही, मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणारा शिवसैनिक आहे. पक्ष प्रमुखांजवळ हट्ट करणे हा अधिकार आहे. आताच्या येणाऱ्या बातम्या या बदनामी करणाऱ्या आहेत. मी संघटनेच्या नेत्यांचा आदेश मानणारा नेता आहे.मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे, माझ्याकडे पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली असताना मी नाराज होण, इकडे तिकडे जाणे या हवेतील गप्पा आहेत.   मी मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे, माझी इच्छा मी लपवून ठेवलेली नाही. या मतदार संघात अजुनही साहेबांनी उमेदवार दिलेला नाही, असंही अंबादास दानवे म्हणाले.

मोठ्या भूकंपाच्या तयारीत! अंबादास दानवे नाराज; शिंदे गटाच्या वाटेवर? मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न

"माझ्यात  आणि इतर नेत्यांच्यात फरक आहे, मी माझ मत बिंदास्त मांडतो.दोन दिवसापूर्वी कार्यालयाच्या भूमीपूजनाची कल्पना नव्हती. प्रचाराची असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी आहे, याबाबत मी पक्षप्रमुखांना सांगितलं आहे.  एकांगीपणाने कोण वागत असेलतर पक्ष प्रमुखांच्या कानावर घालावं लागतं. मी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली, आग्रह केला. चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलतात, असा आरोपही दानवे यांनी खैरे यांच्यावर केला. 

अंबादास दानवे म्हणाले, मागच्या दोन निवडणुकीत मी प्रचार प्रमुख होतो. यावेळीही पक्षप्रमुख देतील ती जबाबदारी मी पार पाडेन. आमचा वाद नाही, पक्षात आमच्यात स्पर्धा आहे. शिंदे गटात मी कधी जाणार नाही, असं स्पष्टीकरण दानवे यांनी दिले. जोपर्यंत उद्धव ठाकरे मतदार संघातील उमेदवाराचा निर्णय घेत नाहीत तोपर्यंत मी उमेदवारीसाठी दावेदार आहे, छत्रपती संभाजीनगरमधून कोण लढणार हे अजुनही निश्चित झालेलं नाही, असंही दानवे म्हणाले. 

Web Title: Talks about me being upset are pointless says Ambadas Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.