विद्यार्थ्यांना मिळाला यशाचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:51 PM2018-01-13T23:51:45+5:302018-01-13T23:55:43+5:30

अनेकदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात चूक केल्यामुळे किंवा मार्गदर्शन न मिळाल्यामुळे वाटा चुकलेले अनेक जण आजूबाजूला दिसून येतात. एक चुकीचा निर्णय आयुष्याची वाताहत करू शकतो. त्यामुळे आपल्या करिअरसंबंधी अत्यंत जागरूक राहून विचारपूर्वक निर्णय घ्या, असा हितोपदेश मोटिव्हेशनल स्पीकर विवेक मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना केला आणि यशाचा मंत्र समजावून सांगितला.

Students get the mantra of success | विद्यार्थ्यांना मिळाला यशाचा मंत्र

विद्यार्थ्यांना मिळाला यशाचा मंत्र

googlenewsNext
ठळक मुद्देकरिअर मार्गदर्शन : लोकमत आणि एसआरएम युनिव्हर्सिटीतर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अनेकदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात चूक केल्यामुळे किंवा मार्गदर्शन न मिळाल्यामुळे वाटा चुकलेले अनेक जण आजूबाजूला दिसून येतात. एक चुकीचा निर्णय आयुष्याची वाताहत करू शकतो. त्यामुळे आपल्या करिअरसंबंधी अत्यंत जागरूक राहून विचारपूर्वक निर्णय घ्या, असा हितोपदेश मोटिव्हेशनल स्पीकर विवेक मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना केला आणि यशाचा मंत्र समजावून सांगितला.
चेन्नई येथील एसआरएम युनिव्हर्सिटी आणि लोकमत यांच्यातर्फे शुक्रवारी सायंकाळी लोकमत हॉल येथे ‘यशाचे मंत्र’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोटिव्हेशनल ट्रेनर मेहेत्रे आणि एसआरएम युनिव्हर्सिटीचे आॅटोमोबाईल इंजिनिअरिंगचे प्रमुख डॉ. एम. लिनस मार्टिन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना मेहेत्रे म्हणाले की, करिअर ठरविताना लोक काय म्हणतात याचा विचार अजिबात करू नका. स्वप्न बघू नका, ध्येय बघा. कारण स्वप्न कधीही पूर्ण होत नाहीत. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. मार्टिन म्हणाले की, उच्चशिक्षणासाठी विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थांची निवड करताना त्यांची मान्यता, वैशिष्ट्ये, सुविधा, कॅम्पस आणि प्लेसमेंट, या बाबी विद्यार्थी आणि पालकांनी जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. एसआरएम युनिव्हर्सिटीमध्ये अ‍ॅक्टिव्ह लर्निंग, नॉलेज बेस शिक्षण दिले जाते. येथे नॅनो सायन्स, आॅटोमोटिव्ह आदी शाखांसह सेंटर आॅफ एक्सलन्स आहे. परदेशांतील विद्यापीठांसमवेत एसआरएम विविध शैक्षणिक उपक्रम राबविते. त्यासह विद्यार्थ्यांचे कलागुण, क्रीडा-कौशल्यासह व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात.


एसआरएम ही वर्ल्डक्लास युनिव्हर्सिटी असून, येथे विद्यार्थ्यांना जे वर्गात शिकविले जाते, ते प्रयोगशाळेत प्रत्यक्षात करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांना योग्य करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत केली जाते.
या कार्यशाळेतून उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले असून, आपल्या करिअरकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची संधी मिळाली, अशी प्रांजळ मते अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी व्यक्त केली. मार्गदर्शन सत्रानंतर डॉ. एम. लिनस मार्टिन आणि विवेक मेहेत्रे यांनी विद्यार्थी आणि पालकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे निरसन केले.

Web Title: Students get the mantra of success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.